करंदीच्या सरपंचपदी सोनाली ढोकले व उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले बिनविरोध

मुख्य बातम्या राजकीय

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता शिरूर) येथील सरपंच उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी सोनाली ढोकले तर उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

करंदी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत च्या सरपंच सुभद्रा ढोकले व उपसरपंच बबलू ढोकले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच सदर पदांची निवडणूक घेण्यात आली. यावेळी मावळत्या सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबलू ढोकले, ग्रामपंचायत सदस्य संदिप ढोकले, नितीन ढोकले, पांडुरंग ढोकले, शिवाजी दरेकर, अंकुश पंचमुख, सुनिता ढोकले, शोभा दरेकर, शारदा ढोकले, सोनाली ढोकले, रेखा खेडकर, उज्वला नप्ते हे उपस्थित होते. दरम्यान सरपंच पदासाठी सोनाली ढोकले यांचा तर उपसरपंच पदासाठी पांडुरंग ढोकले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजीव साळवी, तलाठी अमोल कडेकर, ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे यांनी जाहीर केले.

निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सुहास ढोकले, संतोष ढोकले, दिलीप ढोकले, गोरक्ष ढोकले, वसंत ढोकले, सैनिकभाऊ ढोकले, शरद ढोकले, नरसिंग ढोकले, राजाभाऊ ढोकले, पोपट नप्ते, बाबाजी कंद्रुप, सागर झेंडे, माऊली दरेकर, विशाल खरपूडे, नितीन कदम, लहु दरेकर, बाप्पू दरेकर यांसह आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. तर निवडीनंतर बोलताना गावच्या विकासकामांना अधिकाधिक गती देणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सोनाली ढोकले व उपसरपंच पांडुरंग ढोकले यांनी सांगितले.