गुनाट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छकुली गोरक्ष धुमाळ यांची बिनविरोध निवड

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गुनाट या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छकुली गोरक्ष धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक शुभांगी पोळ आणि सरपंच संदेश करपे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.२३) रोजी ग्रामपंचायतीची विशेष सभा घेऊन या सभेत छकुली धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

गुनाट ग्रामपंचायतची सदस्य संख्या नऊ आहे. पहिले दोन वर्षे तत्कालीन उपसरपंच रोहिणी गव्हाणे यांचा दोन वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. या पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत छकुली गोरक्ष धुमाळ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

यावेळी भाजपा पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, शिरुर तालुका भाजपाचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, बाजार समितीचे उपसभापती सतीश कोळपे, बाजार समिती संचालक राहुल गवारे, भाजपा कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे, भाजपा कोअर कमिटीचे सदस्य राजेंद्र कोरेकर, भाजपा उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय भोस, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे, भाजपा संघटक ज्ञानेश्वर भैरट,माजी सरपंच गणेश कोळपे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी तसेच महिला वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच छकुली धुमाळ यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सतीश सोनवणे यांनी तर आभार नवनाथ धुमाळ सर यांनी मानले.

यापुढे ग्रामपंचायतची पुढील विकास कामे दलित व आदिवासी वस्तीतील कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ गुनाट व सुंदर गुनाट परिसर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे छकुली गोरख धुमाळ यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी निवडीनंतर बोलताना सांगितले.