Video; पुणे-नगर रस्त्यावर फलके मळा येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी

क्राईम मुख्य बातम्या

कारेगाव (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर (दि २०) रोजी दोन दुचाकींच्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या संदीप नामदेव गाडिलकर (वय ३५) रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे याचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. तर दुचाकी चालविणाऱ्या दत्तात्रय धुमाळ याच्या डोक्यास दुखापत झाली आहे. याबाबत विशाल बाळू गाडीलकर (वय २४) याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २:४५ च्या सुमारास पुणे-नगर महामार्गावर कारेगावच्या हद्दीतील फलके मळा येथील चौकात दुचाकी क्रं एम एच ४२ ए एम ९२८५ वरील अज्ञात चालक याने रस्त्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन कोणताही इशारा न देता. तसेच महामार्गावरील वाहनांना प्राधान्य न देता त्याच्या ताब्यातील दुचाकी हि पुणे-नगर रस्त्यावर रस्ता ओलांडून कर्डीलवाडीकडे जाण्याकरता अचानक पुढे घेतली.

 

त्यामुळे पुण्याच्या बाजुकडून नगरकडे जाणाऱ्या संदीप गाडीलकर याची दुचाकी क्रं एम एच १२ आर सी २२६३ याचा भीषण अपघात होऊन गाडीलकर हा उपचारापूर्वी मयत झाला. तर दुचाकी चालवणारा दत्तात्रय धुमाळ याच्या डोक्याला दुःखापत झाली. या अपघातात दोन्ही मोटरसायकलचे नुकसान झाले असुन गाडीलकर याच्या मृत्यूला कारणीभूत झाला असल्याने अज्ञात वाहनचालका विरोधात रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात पुढील अधिक तपास करत आहेत.

शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

मंगलदास बांदल यांच्या पत्नी आणि भावालाही ईडीने चौकशीला बोलावलं; ईडीच्या कोठडीत अजुन आठ दिवस बांदलाचा मुक्काम

मंगलदास बांदल यांना ईडीने केली अटक; कोट्यवधींचं घबाड