शिरूर: शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघालेले शिरू-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने चिमुकलीला (वय ४) जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी (ता. 30) दुपारी बोऱ्हाडेमळा येथे घडली. या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे ही एकटीच रस्ता ओलंडत असताना अपघात झाला आहे.
आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी शिरूर येथे येत होते. बोऱ्हाडे मळा येथील हुंदाई शोरूम समोर शुभ्रा बोऱ्हाडे ही चिमुकली एकटीच पुणे-अहिल्यानगर महामार्ग ओलांडत होती. एका कारच्या आडून ती अचानक आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कार (क्र. एमएच१२, एनएक्स १३९१) समोर आली. ज्ञानेश्वर कटके यांच्या चालकाने जोरदार ब्रेक दाबला. परंतु गाडीच्या वेगामुळे शुभ्राला समोरासमोर जोराची धडक बसली. यात ती चेंडूसारखी उडून काही फुट अंतरावर डांबरी रस्त्यावर पडली. यात तिला गंभीर जखमी झाली.
आमदार ज्ञानेश्वर कटके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारमधून खाली धाव घेत शुभ्रा हिला मदत करत उचलले आणि त्यांच्याच कारमधून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे.
आमदार माऊली कटके यांच्या दुर्लक्षाने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी…?
शेतकऱ्यांच्या हितासाठी खरीप हंगाम नियोजन बैठक उत्साहात पार; आमदार माऊली कटके यांचे मार्गदर्शन
आमदार माऊली कटके यांच्या प्रयत्नातून एस.टी. बससेवेचे लोकार्पण, आढावा दौऱ्याची यशस्वी सांगता
शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…
Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात आईचा जागीच मृत्यू, दोन चिमुकले जखमी…