school-teacher

शिरूर तालुक्यातील शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल…

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील सोने सांगवी येथील अनिल शेळके या शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अनिल शेळके हा कारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असून, तो शिरूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा संचालक आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव येथील मुलींची गैरवर्तन करणे, मुलींना बॅड टच करणे, मुलींकडून अंगाची मालिश करून घेणे असे काही कृती हा अनिल शेळके करत होता. याबाबत पालकांनी शाळेतील इतर शिक्षकांशी मुख्याध्यापकांशी व गावातील पदाधिकाऱ्यांची संपर्क साधून संबंधित शिक्षकाचा प्रताप कानावर घातल्यावर मुख्याध्यापक सुरेश बेंद्रे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्यादा दिली आहे. या फिर्यादीची दखल घेत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सोनेसांगवी येथील शिक्षक अनिल महादेव शेळके याच्यावर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सदर आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले. ही कारवाई महिला पोलिस अधिकारी सविता काळे, अभिमन्यू कोळेकर, ज्ञानेश्वर शिंदे व आर. बी. कर्डिले यांच्या पथकाने केली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वाघमोडे व गटविकास अधिकारी महेश डोके, गटशिक्षण अधिकारी कळमकर यांनी तत्परता दाखवून अनिल शेळके याला तात्काळ गुन्हा दाखल करून अटक देखील केली त्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांवर कारेगाव ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्ष होत आहे.

दरम्यान, गावोगावी शाळेचा कारभार व्यवस्थित हाकण्यासाठी व शाळेच्या विकासाला मोलाची मदत होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र या शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांमधील वाढलेल्या सलगी मुळे व्यवस्थापन समित्यांचा शिक्षकांवर दबाव वाढण्याऐवजी, शिक्षक व्यवस्थापन समित्यांना जुमानत नसल्यामुळेच असे गैरकृत्य घडत आहेत.

शिरूर! दिगांबर सायकल नसल्याने शाळेत पायी यायचा; उपचारादरम्यान मृत्यू…

शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…

शिरूर! फायनान्स कंपनीच्या आरेरावीला कंटाळून उचलले आत्महत्येचे पाऊल…

शिरूर तहसील कार्यालयातील अधिकारी लाच घेताना पकडला…

शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…