jagannath-kadam-sadalgaon

सादलगावमध्ये मुख्याध्यापक जगन्नाथ कदम यांचा नागरी सत्कार!

सादलगाव (संपत कारकूड): सादलगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जगन्नाथ बापूराव कदम यांच्या सेवापुर्तीनिमित्त शाळा व्यवस्थापन समिती, गावचे ग्रामस्थ आणि शाळेतील सर्व विध्यार्थी यांच्याकडून सपत्नीक भव्य नागरी सत्कार करण्यात आला. जगन्नाथ कदम हे ३० एप्रिल २०२४ रोजी निवृत्त होत असून जि. प. प्रा शाळा सादलगाव या ठिकाणी गेली सहा वर्षांपासून सादलगाव येथे […]

अधिक वाचा..
arrest

चित्रपटाच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक…

अहमदनगर: एकाने मुलीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 23 लाखाच्या मोबदल्यात कार देण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीने एका तोतया आरटीओ अधिकार्याला सोबत घेऊन शिक्षकाच्या बोगस कागदपत्रांवर सह्या घेण्याचा प्रयत्न कोतवाली पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे. राजेश भगवान पवार (वय 33 रा. […]

अधिक वाचा..
santosh gawade

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संतोष गावडे; नूतन कार्यकारिणी…

शिक्रापूर : शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संतोष गावडे तर महिला शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी नयना अरगडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग मंगल कार्यालय न्हावरा फाटा येथे पार पडलेल्या तालुका संघाच्या अधिवेशनात ही निवड करण्यात आली. यावेळी श्री संभाजीराव थोरात यांनी सांगितले की, […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण होईपर्यंत 50 टक्के शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू; दिपक केसरकर

मुंबई: शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली असून दोन टप्प्यांत शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले. ही प्रक्रिया थांबवलेली नसून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी तसेच जिल्हानिहाय बिंदू नामावलीचे काम पूर्ण होताच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. विधान परिषद सदस्य किरण सरनाईक यांनी यासंदर्भातील […]

अधिक वाचा..
jategaon school

शिरूर तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल स्थानी…

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक ) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. राज्यातील सर्वाधीक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यात शिरूर तालुका अव्वलस्थानी असल्याची माहिती शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १२ फेब्रुवारी २०२३ […]

अधिक वाचा..
arun sakore sir

भैरवनाथ विद्याधाम प्रशालेतील शिक्षक अरुण साकोरे सेवानिवृत्त…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भैरवनाथ विद्याधाम प्रशाला या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक अरुण साकोरे हे 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले. निरोप समारंभाच्या वेळी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी परिसरातील ग्रामस्थ, नागरिकांची बहुसंख्य उपस्थिती होती. साकोरे सर हे ग्रामस्थ व संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात, गावच्या कार्यक्रमात […]

अधिक वाचा..
crime

पुण्यातील प्राध्यापिकेला विद्यार्थ्याने दिली अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पुणेः पुणे शहरातील एका प्राध्यापिकेला विद्यार्थ्यांने व्हॉटसअप कॉल करुन बदनामी करण्याची भीती दाखवली आणि त्यांचा अश्लिल व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत 5 हजार अमेरिकन डॉलरची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राध्यापिकेने मयांक सिंग (वय 26, रा. पाटणा, बिहार) या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हडपसर पोलिस पुढील तपास करत आहेत. विद्यार्थ्याने […]

अधिक वाचा..
Baramati teacher

शिक्षक दारू पिऊन वर्गातच झोपला; गावकऱ्यांनी काढला व्हिडीओ अन् पुढे…

बारामती: तरडोली (ता. बारामती) येथील भोईटे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला होता. सजग नागरिकाने अचानक शाळा भेट केल्याने सदर प्रकार समोर आला. याबाबतचा व्हिडीओ बनविला गेल्याने बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. भरत चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे. भोईटेवाडी जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..
waghale-school-get-together

कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!

शिक्रापूरः शाळेतील दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शाळा सुटली तरी शाळेच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी जपल्या जातात. पुढे प्रत्येकाची वाट वेगवेगळी होते. पण, शाळेतील मित्र-मैत्रीणी म्हटले की प्रत्येकाला भेटायला आणि जुन्या आठवणीत रमायला आनंद वाटतो. वाघाळे येथील कालिकामात विद्यालयातील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी एकत्र आले आणि शाळेच्या आठवणींमध्ये रमून गेले होते. कालिकामाता माध्यमिक […]

अधिक वाचा..

स्वराज्य शिक्षक संघटनेचे 6 जून पासून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेसाठी बेमुदत उपोषण

शिरुर (तेजस फडके): प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पार पडली असून टप्पा क्रमांक सहा मधील (अवघड क्षेत्र भरणे) शिक्षकांना दिनांक 7 जून 2023 पर्यंत कार्यमुक्त करू नये असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 4 मे 2023 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश काढले. या आदेशानुसार न्यायालयाने स्थगिती दिलेल्या याचिका […]

अधिक वाचा..