मांडवगण फराटा (संपत कारकुड) : शिरूर तालुक्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ निवडीत शैक्षणिक अर्हता जाहीरनाम्यातील प्रसिद्ध केलेली अहर्ता व प्रत्यक्ष निवड करताना लागू केलेली अहर्ता यामध्ये मनमानी झाल्याचा गंभीर आरोप अनेक उमेदवारांनी लेखी व तोंडी स्वरूपात प्रांत अधिकारी, पुणे कार्यालयाकडे सादर केला आहे. यामुले वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
शासनाकडून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ निवडीसाठी शिरूरची यादी प्रसिद्ध झालेनंतर यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले जात आहेत. शैक्षणिक पात्रतेसंबंधी प्रत्यक्ष जाहीरनाम्यात कम्प्युटरचे एम.एस.सी.आय.टी. किंवा समकक्ष प्रमाणपत्र, संगणक हाताळणी, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, सायबर सुरक्षा याचे ज्ञान असावे, असा स्पष्ट उल्लेख असताना केवळ एम.एस.सी.आय.टी चे प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांनाच पात्र ठरविण्यात आलेले असून, समकक्ष पात्रता असलेल्या व संगणकाचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरवल्याने अनेक उमेदवारांना मुलाखतीस मुकावे लागणार आहे, हा अन्याय होत असल्याची टिपणी अनेक अपात्रधारकांकडून होत आहे.
View this post on Instagram
विशेष बाब म्हणजे केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या सीएससी केंद्र चालकांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. गेली दहा ते बारा वर्षांपासून चालवीत असलेले सीएससी केंद्र चालक यामध्ये अपात्र कसे करण्यात आले आहेत? कम्प्युटरचे ज्ञान असल्याशिवाय त्यांना केंद्राचा आयडी मिळाले नाहीत. याचा विचार प्रांत अधिकारीने केलेला दिसून येत नाही. अनेक केंद्र चालकच अपात्र ठरल्यामुळे मोठा-मोठा घोळ उघड होत आहे. मनमानी मूल्यांकन हेच कारण पात्रधारकांकडून व्यक्त केले जात असून समक्ष कम्प्युटर्स ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी संधी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. नावापुरता सीएससीआयडी काढून प्रत्यक्ष कार्यान्वित नसताना केवळ एम.एस.सी.आय.टी चे प्रमाणपत्र असल्यामुळे अनेक उमेदवारांना पात्र ठरवण्याची किमया प्रांत कार्यालया मधून करण्यात आलेली दिसून येत आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ निवडीची पद्धत संशयाच्या पिंजऱ्यात येताना दिसत आहे.
शिरूर तालुक्यात ‘ऑनलाईन सेवे’साठी ‘ऑफलाईन निवड’ प्रक्रियेचे गौडबंगाल…
शिरूर! लाचखोर हवालदार गजाआड; मात्र लाचखोरीच्या ‘वरिष्ठ सूत्रधारां’चा शोध सुरु…
Video! सणसवाडीतील फोसेको इंडिया कंपनीत भीषण अपघात; पल्पर मशीनमध्ये अडकून परप्रांतीय मजूर गंभीर जखमी…
Video; शिरुर अन श्रीगोंदा महसुल विभागाचा वाळू माफियांना दणका; आठ सेक्शन अन नऊ फायबर बोटी फोडल्या
शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…