ware-guruji-abp

वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट करणाऱ्या वारे गुरुजींना पुरस्कार!

मुख्य बातम्या

मुंबईः शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट करणाऱ्या वारे गुरुजींना एबीपी माझाच्या वतीने ‘माझा सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. एबीपी माझाच्या यंदाच्या ‘माझा सन्मान’ पुरस्कारांचे वितरण झाले. यामध्ये विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे. ‘माझा सन्मान’ पुरस्कार सोहळा आज (26 ऑगस्ट) रात्री आठ वाजता आणि उद्या (27 ऑगस्ट) रात्री सात वाजता एबीपी माझा चॅनेलवर पाहता येणार आहे.

वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की काही दिवसांपूर्वी नाकं मुरडली जायची. पण, वारे गुरुजींनी शाळेचे नाव मोठे केले आहे. त्यांच्या कल्पनेला आणि मेहनतीला अनेक हातांची साथ लाभली. वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची ही शाळा आंतरराष्ट्रीय झाली आहे. केवळ व्यवस्थेकडे बोट दाखवत न बसता वारे गुरुजींनी हे करुन दाखवले आहे.

शाळेचा कायापालट करत असताना वारे गुरुजींवर अनेक आरोपही झाले, बदली झाली. पण बदली होऊनही गेलेल्या जालिंदरनगर शाळेचाही त्यांनी सात महिन्यात कायापालट केला आहे. नवी पिढी ज्या ज्ञानमंदिरात घडते त्या ज्ञानमंदिरांना घडवणाऱ्या वारे गुरुजींना एबीपी माझाच्या वतीने ‘माझा सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

दरम्यान, दत्तात्रेय वारे गुरजींची बदली काही महिन्यांपू्र्वीच खेड तालुक्यातील कन्हेरसर गावातील जालिंदरनगरच्या शाळेत झाली. ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच वारे गुरूजींनी काही शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. गुरूजींच्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आता रांगा लागत आहेत. या शाळेतील मुले फ्रेंच, जर्मनी, जपानी, इंग्रजीसारख्या परदेशी भाषा अगदी सहजपणे बोलतात. केवळ 100 ते 200 नव्हे तर एक हजारापर्यंतचे विद्यार्थ्यांचे पाढे तोंडपाठ आहेत. तंत्रज्ञानातही ही मुले एक पाऊल पुढे असल्याने वारे गुरूजी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरण अन् बरच काही…

शिक्रापुरात येऊन शिक्षण मंत्र्यांनी फिरवली वाबळेवाडीकडे पाठ

शिक्रापूरच्या वाबळेवाडीत जमिनीच्या वादातून हाणामारी