न्हावरे (अक्षय टेमगिरे) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस गणातील जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल लागून अवघे दोनच दिवस झाले असतानाच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली राहुल गव्हाणे यांनी कामाला सुरुवात केली आहे. दिपाली गव्हाणे यांनी आपल्या कार्यपद्धतीची वेगळी छाप उमटवण्याचा निर्धार केला आहे. पदाचा आनंद साजरा करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
शिरूर तालुक्यातील पारोडी येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित जनसंवाद व आभार दौऱ्याद्वारे त्यांनी जनतेशी थेट संवाद साधत लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीची प्रभावी सुरुवात केली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच जनसंवाद, आभार दौरा आणि गावभेटींचा कार्यक्रम आखून लोकशाहीतील खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीची भूमिका निभावण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या दौऱ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक सत्कारांना फाटा देत विकासकामांना प्राधान्य देण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला. कार्यक्रमासाठी नागरिक व कार्यकर्त्यांना बुके, पुष्पगुच्छ किंवा हार न आणता आपल्या परिसरातील विकासकामांबाबत लेखी निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले होते. सन्मानापेक्षा समस्या महत्त्वाच्या हा लोकाभिमुख विचार त्यांनी यावेळी अधोरेखित केला.
लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता जनतेसोबत सतत उभा राहू शकतो, याचे प्रभावी उदाहरण म्हणजे ॲक्शन मोडमध्ये असणाऱ्या दिपाली गव्हाणे असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नवनिर्वाचित दिपाली गव्हाणे यांचा सत्कार रूपाली मंगेश टेमगिरे यांनी केला. तळेगाव गणातील पंचायत समिती सदस्या विद्याताई राजेंद्र भुजबळ ही उपस्थित होत्या. हनुमंत काळे यांचा सत्कार पारोडी गावचे ज्येष्ठ नागरिक शिवाजी बाबासो टेमगिरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील महिला भगिनींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकीय कारकीर्दीची दमदार सुरुवात करणाऱ्या दिपाली गव्हाणे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
View this post on Instagram
Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…
शिरूर तालुक्यात निवडणूक जल्लोषानंतर शांतता अन् चर्चांना उधाण…
शिरूर! कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का…
‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप