शिरुर मध्ये एस के खांडरे सराफ यांच्या भव्य सुवर्ण दालनाचे उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते उदघाटन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) येथील 200 वर्षाहूनही अधिक काळ जुन्या सुवर्णपेढीची विश्वासार्ह परंपरा असलेल्या एस के खांडरे भैय्या सराफ यांच्या भव्य सुवर्ण दालनाचे उद्या (दि 19) रोजी सकाळी 10:05 वाजता शिरुरचे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल तसेच त्यांच्या पत्नी दिना धारीवाल यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती शंतनु खांडरे यांनी दिली.

सध्या खांडरे सराफ यांची पाचवी पिढी हा व्यवसाय जोमाने पुढे नेत असुन जुन्या जागेतुन भव्य प्रशस्त नव्या दुमजली वास्तुत या दुकानाचे स्थलांतर होत आहे. खांडरे सराफ यांची पहिली पिढी चिन्नप्पा खांडरे सराफ, दुसरी पिढी काशिनाथ चिन्नाप्पा खांडरे सराफ, तिसरी पिढी सदाशिव काशिनाथ खांडरे सराफ, चौथी पिढी सतिश सदाशिव खांडरे व सुरेश सदाशिव खांडरे आणि आता पाचवी पिढी शंतनु खांडरे तसेच संपुर्ण खांडरे परीवार हा या व्यवसायात आजही सक्रीय आहेत.

शिरुर शहरात मनमोहक, कलात्मक आणि आधुनिक हॉलमार्क प्रमाणित दागिने, सर्वात मोठे सुवर्ण दालन अन् सर्वात कमी मजुरी हे एस के खांडरे भैय्या सराफ यांच्या सुवर्णपेढीच वैशिष्ट्य आहे. तसेच जुना दागिना मोडून नवीन दागिना घडविताना जुन्या दागिन्यावर घट धरली जात नाही. त्यामुळे गेले 200 वर्षे शिरुर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ग्राहकांचा विश्वास कमविल्याने ते ग्राहक एस के खांडरे भैय्या सराफ यांच्या सुवर्ण दालनातच दागिने खरेदी करण्यासाठी येतात.