bullak-cart-race

रायफल आणि शंभू बैलजोडीने मालकाला मिळवून दिला 1 बीएचके फ्लॅट!

महाराष्ट्र

सांगली: कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क 1 बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात आला आहे. लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत आणि प्रकाश झोतात ही शर्यत पार पडली. या जयंत केसरी बैलगाडी शर्यतीत सातारच्या रायफल आणि शंभू बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावला आहे. रायफल आणि शंभू बैलजोडीने मालकाला फ्लॅट मिळवून दिला आहे.

माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शरद लाहीगडे फाउंडेशनच्यावतीने या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. वीस एकर माळरानावर पार पडलेल्या या भव्य बैलगाडी शर्यतीसाठी चक्क वन बीएचके फ्लॅटसह लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये प्रदेश येथून सुमारे अडीचशेपेक्षा अधिक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली होती. अत्यंत चुरशीच्या पार पडलेल्या या बैलगाडी शर्यतीमध्ये सातारच्या वाई येथील सचिन शेठ यांच्या रायफल व खटावच्या कळंबी येथील अधिक पैलवान यांच्या शंभू या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावत वन बीएचके फ्लॅट जिंकला. या विजेत्या बैलगाडी चालकांना माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. स्पर्धा पाहण्यासाठी लाखो बैलगाडी शर्यत प्रेमींनी या ठिकाणी हजेरी लावली होती. जयंत पाटील यांनी ट्वीटवरुन विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीचा आंनद लुटला, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पोस्टरमधून पक्ष सोडलेल्यांना टोला देखील लावण्यात आला आहे. यामध्ये ‘इथे ना चालते दादागिरी, ना चालते गद्दारी, इथले निष्ठावंतच लय भारी’ अशा वाक्यामधून जयंत पाटील यांना एकीकडे शुभेच्छा देत शरद पवार आणि जयंत पाटील गटाची साथ सोडल्यांना टोमणा मारण्यात आला आहे. याशिवाय ‘टायगर अभी जिंदा है’ अशा आशयाचेही पोस्टर जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली शहरात ठीकठिकाणी लागले आहेत.

आई-वडील शेतात अन मुल बैलगाडा घाटात ग्रामीण भागातील चित्र…

धक्कादायक! बैलगाडा शर्यतीदरम्यान 21 लाखांच्या बैलाचा दुर्देवी मृत्यू…

शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, भावाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन दिला चक्क बैलगाड्याचा “गोऱ्हा”

वाघाळे येथील कालिकामाता यात्रेत तब्बल ५०० बैलगाडे अन् Live Video…

‘जुन ते सोन म्हणतं’ रांजणगाव येथील फंड कुटुंबाने बनवली दिड लाख रुपयांची बैलगाडी

खिलारी बैलांचा मृत्यू झाल्याचे पाहून मालक ढसाढसा रडला…