शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील सत्तावीस वर्षीय युवकाने करमाळा येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली असून केतन कैलास कापरे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
धामारी (ता. शिरुर) येथील केतन कापरे याचे घरात किरकोळ वाद झालेले असताना केतन रागाने निघून गेला होता. दरम्यान २७ एप्रील रोजी करमाळा रेल्वे स्टेशन येथे जात केतन याने रेल्वे खाली आत्महत्या केली.यावेळी करमाळा पोलिसांनी सदर ठिकाणी पंचनामा केला असता केतनच्या खिशात वडिलांचे आधार कार्ड व बँकेच्या पावत्या आढळून आल्याने त्यांनी शिरुर पोलीस स्टेशन कडे संपर्क करत माहिती दिली.
शिरुर पोलिसांनी शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने धामारी ग्रामस्थांशी संपर्क केला असता घडलेला प्रकार समोर आला असून सदर घटनेत केतन कैलास कापरे (वय २७) रा. धामारी (ता. शिरुर) जि. पुणे याचा मृत्यू झाला असून घडलेल्या प्रकाराने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.