रांजणगावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सुवर्णा वायदंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती गावात ‘भारतीय जनता पार्टी’ त इनकमिंग सुरुच असुन चार दिवसांपुर्वी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाबुलाल गदादे यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज (दि २०) रोजी लोकनियुक्त महिला सरपंच सुवर्णा वायदंडे यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुर्वी रांजणगाव मधील ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी गटात असलेल्या दोन जणांनी ‘भाजपा’ मध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता रांजणगावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सुवर्णा वायदंडे यांनीही भाजपा मध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

रांजणगाव ग्रामपंचायत मधील सत्ताधाऱ्यांनी दोन वर्षे मला खुप त्रास दिला. तसेच सातत्याने विकासकामाबाबत मला विश्वासात घेतले नाही त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सत्तेचा गैरवापर करुन गेली दोन वर्षे जाणीवपुर्वक रांजणगावच्या विकासाचा गाडा अडवून ठेवण्यात आला. याचा थेट फटका गावाच्या सर्वांगीण प्रगतीला आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना बसला आहे. “रांजणगावचा सर्वांगीण विकास साधणे आणि दडपशाहीच्या वातावरणातुन गावाला मुक्त करुन भयमुक्त करणे हेच माझे अंतिम ध्येय आहे,” अशी ठाम भुमिका त्यांनी मांडली.

दौंडचे आमदार राहुल कुल हे माझ्या माहेरचेच आहेत, याचा मला अभिमान आहे, असे सांगत पुढील राजकीय वाटचाल आमदार राहुल कुल, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर तसेच स्वाती पाचुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु राहील, असा स्पष्ट संकेतही त्यांनी दिला. या निर्णयामुळे रांजणगावच्या राजकारणात खळबळ उडाली असुन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभुमीवर राजकीय संघर्षाची चिन्हे स्पष्ट दिसु लागली आहेत.

रांजणगाव गणपती गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सुवर्णा वायदंडे यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला असल्याचे कळले याबाबत पत्रकार लवकरच परीषद घेऊन सविस्तर खुलासा करु…

मानसिंग पाचुंदकर 

तालुकाध्यक्ष:- आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघ