स्वर्गीय गणेश घावटे पाटील यांच्या जयंतीनिमित्त माहेर संस्थेच्या मुलांना पुरणपोळीचे जेवण 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे): एखादी व्यक्ती आपल्याला सोडुन देवाघरी गेल्यानंतर त्याच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीला कशाची आवड होती. ते पाहून आपण त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याचे काम पुढे चालु ठेवले पाहिजे. तसेच त्यांचे अधुरं राहिलेलं स्वप्न आपण तो व्यक्ती नसतानाही पुर्ण केल्यास इतरांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास रामलिंग महिला बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी व्यक्त केला.

स्वर्गीय गणेश गौतम घावटे पाटील यांचा 4 एप्रिल 1989 हा जन्मदिवस दोन वर्षांपुर्वी कोरोनामुळे 8 जून 2021 रोजी त्यांचे निधन झाले. परंतु गणेश यांना अन्नदान करण्याची खुप आवड होती. तसेच समाजातील गरजूंना मदत करायची त्यांना खूप आवड होती. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार (दि 4 ) रोजी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन माहेर संस्थेतील मुलांच्या हस्ते केक कापून हा दिवस साजरा केला. तसेच त्यांचा जन्मदिवस हा त्यांनी केलेले चांगले कार्य स्मरणात रहावे म्हणून शिरुर येथील माहेर संस्थेतील मुलांना “पुरणपोळी”चे जेवण देण्यात आले.

समाजात असे अनेक घटक आहेत त्यांना वेळेवर जेवण सुद्धा मिळत नाही. तसेच शिरुर तालुक्यात अनेक अनाथ मुलांच्या संस्था आहेत. त्यांना पण अनेक गोष्टीची गरज असते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्या लोकांनी जसे जमेल तसे अन्नदान केले पाहिजे. या मुलांमध्ये जाऊन हा दिवस साजरा केल्यामुळे त्यांनाही एक वेगळाच आनंद मिळाला.

यावेळी युवा उद्योजक बाळकृष्ण कर्डिले, पत्रकार किरण पिंगळे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, डॉ वैशाली साखरे, साक्षी कर्डिले, मिनल रेपाळे, उमेश घावटे, राहुल मोहळकर तसेच स्व.गणेश घावटे पाटील युवा मंचचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.