शेतकऱ्यांच्या सोसायटीचा भरणा करण्यासाठी धावून आले चेअरमन; बापुसाहेब शिंदे यांची शेतकऱ्यांना आर्थिक मदत

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मार्च महिना म्हणलं की सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रीय बँका, पतसंस्था, सहकारी सोसायटी यांनी हप्ते भरण्यासाठी तगादा लावलेला असतो. अनेकवेळा शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे हप्ते भरण्यासाठी सावकारांच्या दारात जावे लागते. मार्च महिन्यात सोसायट्यांचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक ओढाताण होते. शेतकऱ्यांची ही आर्थिक ओढाताण टाळण्यासाठी रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना सोसायटी भरण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली असल्यामुळे त्यांच्यावर परीसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील बापुसाहेब शिंदे हे शेतकरी कुटुंबातील असुन सध्या ते रांजणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सध्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज भरणा प्रक्रिया सुरु असुन सर्वसामान्य शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायची वेळ येऊ नये म्हणुन बापुसाहेब शिंदे यांनी सोशल मिडियाद्वारे आवाहन करुन ज्या शेतकऱ्यांना सोसायट्यांचे कर्ज भरण्यासाठी पैसे नाहीत. अशा शेतकऱ्यांना स्वतःच्या जवळचे पैसे देऊन शेतकऱ्यांच्या कर्जाचा भरणा केला आहे. तसेच सावकाराकडुन अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे घेऊन कर्जबाजारी होणाऱ्या शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्ती केली आहे. त्यामुळे परीसरातील सर्वांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सोसायटी नफ्यात यावी. यासाठी १०० टक्के कर्ज वसुली होणे गरजेचे आहे. तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी सावकारांच्या दारात जाऊन अव्वाच्या सव्वा दराने कर्ज काढण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी मी आत्तापर्यंत शेतकऱ्यांना सुमारे २५ लाख रुपये कर्ज परतफेड करण्यासाठी आर्थिक मदत केली आहे.

बापुसाहेब शिंदे 

अध्यक्ष:-रांजणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी 

शिरुर; घोड धरणाची वाळू माफीयांनी लावलीये वाट; रात्रंदिवस वाळू उपशाचा घातलाय घाट