शिरुर; चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याने कारचालकास एक वर्षाचा कारावास

क्राईम मुख्य बातम्या

मांडवगण फराटा (संपत कारकुड) सात वर्षांपुर्वी एका कार चालकाने बेफिकरीने गाडी चालविल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्या चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या आरोपीस शिरुर न्यायालयाने एक वर्षाचा कारावास आणि २५ हजार रुपये दंड शिरुर ठोठावला असुन नानासाहेब गुलाबराव फलके (रा. पिंपळसुटी, ता.शिरुर, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

मांडवगण फराटा येथील धनंजय रमेश हांडे सुट्टी असल्याने आपल्या पत्नीसह दोन मुलींना घेऊन दि ८ मे २०१७ रोजी निर्वी येथे सासुरवाडीला आले होते. पत्नीला गाडीतून खाली उतरविल्यानंतर आपल्या दोन मुली गाडीतून खाली उतरवुन घराकडे रस्ता ओलांडून जात असताना साडेचार वर्षाची मुलगी कु. आराध्य धनंजय हांडे हिला निर्विकडून-न्हावरेकडे जाणाऱ्या स्विफ्ट गाडीचा चालक व मालक नानासाहेब गुलाबराव फलके (रा. पिंपळसुटी, ता. शिरुर, जि. पुणे) याने जोराची धडक दिली होती. त्यानंतर वडिलांनी तात्काळ त्या मुलीला उपचारासाठी शिरुर येथील खाजगी रुग्णालयात नेले.

 

परंतु आराध्य हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परीसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात होती. या घटनेची फिर्याद मुलीचे वडील धनंजय हांडे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे केली होती. शिरुर पोलिसांनी हा तपास पुर्ण करत केस शिरुर कोर्टात दाखल केली होती. तब्बल ७ वर्षांनी याचा निकाल लागुन सरकार पक्षाचा पुरावा अंतिम मानुन न्याय दंडाधिकारी जे ए झारी यांनी आरोपी नानासाहेब फलके याला दोषी ठरवत एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा तसेच 25 हजार रुपये दंडाची शिक्षा केली असुन दंडातील वीस हजार रुपये फिर्यादी धनंजय हांडे यांना देण्याचा आदेश दिला.

 

न्यायालयाच्या निकालावर मी समाधानी; धनजंय हांडे
शिरुर न्यायालयाकडुन आलेल्या निकालावर मी समाधानी असुन या प्रकरणात केस मिटवुन घेण्याचा प्रस्ताव मी धुडाकावून लावला होता. कारण वाहन चालकांचा वाहन चालविण्याचा बेफिकीरपणा कमी होऊन चालकांना वचक बसावा आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून खटला चालविला. यामध्ये मी समाधानी आहे.

वोट के लिये कुछ भी करेगा’ अभिनेत्यांनाही लाजवेल असे नेत्यांचे अभिनय