शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राची इमारत तसेच फाऊंटन (कारंजा) दुरुस्तीबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिरूर नगरपरिषदेला दिले आले.

शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. जलशुद्धीकरण केंद्राशेजारील फाऊंटन (कारंजा) ची फार बिकट अवस्था झालेली आहे. कारंजाच्या पिलरला अनेक ठिकाणी तड़े गेलेले आहेत. काही पिलर तर अक्षरश: सडलेले आहेत. फाउंटनच्या परिसरामध्ये दलदल निर्माण झाल्याने फाऊंटन कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होऊ शकतो.

सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ जलशुद्धीकरण केंद्र इमारत व फाउंटनची दुरुस्ती करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे पत्र नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद यांना मनसेच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरुर प्रवासी संघाचे अनिल बांडे, मनसेचे मा.शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे, मनसेचे महिला आघाडीचे डॉ. वैशाली साखरे आदी उपस्थित होते.