शिरुर तालुक्यात खुलेआम दारुविक्री होत असताना पोलिसांचा यावर वचक आहे की नाही…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाजार मैदान तेथे न्हावरा रोड लगत भर बाजार मैदानात खुलेआम दारुची विक्री होत असून खुलेआम दारु विक्री होत असताना पोलिसांचा यावर वचक आहे कि नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन अंतर्गत तळेगाव ढमढेरे गावामध्ये स्वतंत्र पोलीस चौकी असून सदर ठिकाणी स्वतंत्र पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आलेले आहे. मात्र परंतु गावातील अनेक ठिकाणी गावठी दारु सह देशी विदेशी दारुची विक्री होत असताना पोलिसांकडून कारवाई सुद्धा झालेली आहे. मात्र सध्या गावातील मुख्य बाजार मैदानात खुलेआम अनधिकृतपणे देशी विदेशी दारुची विक्री होत असून सदर ठिकाणी मोठा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.

मात्र गावामध्ये स्वतंत्र पोलीस अधिकारी व कर्मचारी असताना देखील दिवसाढवळ्या राजरोसपणे दारुची विक्री होत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. मात्र आता पोलीस या ठिकाणी कारवाई करत अनधिकृतपणे सुरु असलेली दारुविक्री बंद करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

याबाबत तळेगाव ढमढेरे पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रणजीत पठारे व पोलीस हवालदार अमोल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सदर ठिकाणी पाहणी करुन कारवाई केली जाईल, असे पोलीस हवालदार अमोल चव्हाण यांनी सांगितले.