सर्व मुलांना समान संधी द्यावी, कोणताही भेदभाव नको; राणी कर्डिले

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे): शाळा मराठी मिडीयम असो वा इंग्लिश मिडीयम सगळीच मूल ही खूप हुशार असतील असे नाही. यावेळी हुशार मुलांनाच संधी न देता. प्रत्येक मुलांना संधी दिली पाहिजे तसेच त्यांच्यातील कलागुण ओळखून, त्यांना तसा वाव दिला पाहिजे. यावेळी शिक्षक यांची जबाबदारी मोठी असली तरी पालकांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी उत्तेजीत केले पाहिजे असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिरुर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल येथे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून (दि 1) ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करत इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी कर्डीले प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना कर्डीले म्हणाल्या मुलांनीही स्पर्धेत नंबर नाही आला म्हणून नाराज न होता. अजून जोमाने तयारी केली तर नक्कीच पुढे यश मिळेल.

यावेळी लहान मुलांच्या वेशभुषा स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी लहान मुलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक तसेच भारतमाता असे विविध पोशाख परिधान केले होते. अशा स्पर्धा घेऊन मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळत आहे. तसेच शाळेने अभ्यासा बरोबरच असे उपक्रम राबविल्यामुळे उपस्थित मान्यवरांनी शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले.

यावेळी शिरुर महिला दक्षता समितीच्या उपाध्यक्षा शशिकला काळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ समीर ओंकार, शाळेच्या शिक्षिका जयश्री दांडगे, अश्विनी पिंगळे, शिवानी पिंगळे, रत्नमाला महाजन, संगीता कुलवंत तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहाय्य लाभले.