आहारातील ग्लुटेन कमी ठेवण्यासाठी ज्वारी बाजरीचा आहार वाढावा; डॉ प्रतिमा सातव

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमित्ताने निर्वी तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय आणि शिरुर तालुका कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढुन आहारातील बाजरी व ज्वारीचे महत्व पटवुन देण्याचा चांगला प्रयत्न केला गेला आहे. आहारात ग्लुटेनचा अधिक प्रमाण झाले तर अपायकारक ठरत असुन ग्लुटेन विरहीत ज्वारी व बाजरी खाल्ली तर शरीरीला बाजरीतुन फायबर प्रथिनं कॅल्शिअम जीवनसत्व मॅग्नेशियम इत्यादी घटक मुलबक मिळत असुन हिवाळ्यात उष्मांक निर्माण होण्यासाठी बाजरी उपयोगात येतात बाजरीत ओमेगा या घटकासोबतच किडणी व यकृतला फायदेशीर ठरत आहे तसेच ब्लड प्रेशर याकामी मॅग्नेशियम व पोटॅशियम जास्त असल्याने फायदा होत असुन त्याच तुलनेत ज्वारीत असलेल्या घटकामुळे कॅन्सर सारख्या आजार रोखण्यासाठी ॲन्टी ऑक्सीइन्टस ज्वारीत जास्त मिळतात मधुमेह ह्रदय विकार सारख्या रुग्णांना ज्वारी हिताची ठरत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी ज्वारीही उपयुक्त ठरत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे आहारात ज्वारी व बाजरीचे प्रमाण वाढविणे हिताचे ठरेल असे प्रतिपादन आरोग्य अधिकारी डॉ प्रतिमा सातव यांनी निर्वी येथे केले.

निर्वी येथील तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयातील विद्यार्थ्यांची जनजागृती व्हावी यासाठी गावात प्रभात फेरी काढुन “ब्लड प्रेशरचा आजार भारी, बाजरीची भाकर उत्तम गुणकारी”, “खाता बाजरीची भाकर, नरमेल अंगातील साखर”, “आहारात येईल ज्वारी, कॅन्सर ह्रदय विकारापासुन बचाव करी”, “ज्वारीची भाकर चवीला भारी, त्वचेचे विकार दुर करी”, “पौष्टिक तृणधान्याची आहे ख्याती, आरोग्य हिच खरी संपत्ती” “बाजरीचा होईल आहार, तर लोह प्रथिनं मिळतील फार” अशी घोषवाक्य वापरुन घोषणा देऊन गावकऱ्यांचे लक्ष वेधले.प्रभात फेरी दरम्यान कमलेश बुऱ्हाडे, योगेश सोनवणे, आप्पासाहेब सोनवणे दिपक शहाणे, पोपटराव पवार उपस्थित होते. प्रभात फेरी साठी मुख्याध्यापक रामदास गोरडे, विष्णू करपे, सुधीर थोरात, संगिता दहिफळे, कांचन रहाणे, सचिन नलगे, सेवक नितीन मिसाळ यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच या कार्यक्रमासाठी कृषी सहायक जयवंत भगत यांनीही विशेष योगदान दिले.