सरदवाडी येथील अभिनव विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) सरदवाडी (ता.शिरुर) येथील अभिनव विद्यालय या माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एन एम एम एस) पात्र विद्यार्थ्यांची परंपरा कायम ठेवत चालु २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करत हा यशाचा आलेख उंचावत ठेवल्याबद्दल शिरुर तालुक्याचे माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत (काका) पलांडे यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक संदीप किसन सरोदे तसेच मुख्याध्यापक अरुण गोरडे यांचे अभिनंदन केले.

अभिनव विद्यालयातील सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेस 32 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी 20 विद्यार्थी पात्र झाले तर 3 विद्यार्थी एन.एम. एम .एस परीक्षेत पात्र झाले ,या पात्र मुलांना प्रत्येकी वर्षाला 12 हजार म्हणजे 4 वर्षाला 48 हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीत १०विद्यार्थी पात्र झाले असून प्रत्येक विद्यार्थ्यांला वर्षाला 9600 रुपये प्रमाणे 4 वर्षात 38 हजार 400 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापक अरुण गोरडे यांनी दिली .

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे
1) वेदांत अनिल यशवंत 2) प्रशांत मल्हारी कर्डिले
3) दिव्या भरत इसवे 4) प्रमोद शिवाजी भोगाडे
5) दिक्षा संतोष सरोदे 6) सुरज अनिल फलके
7) वेदांती संतोष आढाव 8) वैष्णवी मल्हारी कर्डीले
9) अदिती नानाभाऊ पोटे 10) पनिघा संतोष दसगुडे,
11) वेदांत संतोष आढाव 12) जान्हवी गोरक्ष फलके 13) कुणाल किशोर रणखांब या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.

या यशाबद्दल बोलताना वेदांत यशवंत आणि प्रशांत कर्डीले म्हणाले की,” सरांनी आम्हाला अगदी जून महिन्यापासून म्हणजेच शाळा सुरु झाल्यापासून सकाळी जादा तास सुरु करुन त्यातील शालेय क्षमता चाचणी व मानसिक क्षमता चाचणी हे विषय योग्य प्रकारे समजावत त्याचा विविध प्रकाशनाच्या प्रश्न पत्रिकांचा सराव घेतला. त्यामुळे आम्हाला सर्व प्रश्नांची उकल योग्य प्रकारे झाली व यश प्राप्त झाले. तर या यशाबद्दल बोलताना दिक्षा संतोष सरोदे ही विद्यार्थीनी म्हणाली, “या परीक्षेचे महत्व लक्षात घेऊन आम्ही सर्व अभ्यासक्रम समजाऊन घेतला सरांनी आमची परीक्षेची तयारी करून घेतली. अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीत पण एक दिवसही सुट्टी न घेता प्रश्नपत्रिकांचा सराव घेतला सरांचे योग्य मार्गदशन आणि आमची जिद्द ,कष्ट करण्याची तयारी यामुळे आम्हाला हे यश प्राप्त झाले.”

तसेच शाळेचे मुख्याध्यापक गोरडे सर म्हणाले, “जिद्द, चिकाटी, मेहनत ,योग्य मार्गदर्शन या जोरावर विद्यालयाचे विद्यार्थी सतत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत गेली अनेक वर्षांपासून यश प्राप्त करत हा आलेख उंचावत ठेवत आहेत. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे संदीप किसन सरोदे यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले सरांनी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात परीक्षा उशीरा झाल्यामुळे वर्षभर जादा तास घेत उन्हाळ्याच्या सुट्टीत ही अविरत प्रश्नपत्रिकांचा सराव घेत हे यश प्राप्त केले.

शिरूर तालुक्याचे माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत काका पलांडे म्हणाले, “अभिनव विद्यालयाचा गुणवत्तेचा आलेख सतत चढता असून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे अथक परीश्रम ,अभ्यासातील सातत्य व योग्य मार्गदर्शन यामुळे विद्यालयाचे विद्यार्थी एन एम एम एस या परीक्षेत सतत यश प्राप्त करत आहेत. विद्यालयाच्या या यशाबद्दल गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक संदीप सरोदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण गोरडे यांचे संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत( काका) पलांडे, संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ ,ग्रामस्थ,पालक यांनी विशेष अभिनंदन केले.