फेशियल योगा करण्याचे फायदे

आरोग्य

चेहरा सुंदर दिसावा असे प्रत्येकालाच वाटणे साहजिक आहे. मात्र, वाढते वय, प्रदूषण, ताणतणाव आणि इतर विविध कारणांमुळे चेहऱ्यावर लवकरच सुरकुत्या दिसू लागतात.

फेशियल योगा

गाल फुगवा आणि हवेला डावीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे हलवा.

जीभ शक्य होईल तितकी बाहेर काढा आणि १०-१५ सेकंदा नंतर परत घ्या.

अंगठा व बोटांनी कपाळ आणि भुव्यांच्या दरम्यान असलेली त्वचा घट्ट धरून ठेवा.

ओठ बंद ठेऊन गालातल्या गालात हसा.

फेशियल योगाचे फायदे

तोंडात हवा भरल्यामुळे चेहर्‍याच्या स्नायूंवर दबाव येतो, ज्यामुळे त्यांचे रक्ताभिसरण सुधारते आणि चमक वाढते.

चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होते. विशेषत: जे दुहेरी हनुवटीची तक्रार करतात. ते जिभेशी संबंधित चेहऱ्याचा योग करू शकतात.

चेहऱ्याच्या त्वचेला अधिक ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे विश्रांतीची भावना येते. त्याच वेळी आपण रीफ्रेश होतो.

(सोशल मीडियावरून साभार)