गूळ खाण्याचे फायदे

आरोग्य

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गूळ खाणे उपयुक्त असते. त्यामुळेच अपचनाचा त्रास कमी होतो.

गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास असतो किंवा ज्यांचे हिमोग्लोबिन खूप कमी असते, अशा व्यक्तींना नियमितपणे गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते.

फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स यांचे प्रमाण देखील गुळामध्ये चांगले असते. त्यामुळे थकवा घालविण्यासाठी गूळ अतिशय उपयुक्त ठरतो.

गुळामध्ये झिंकदेखील योग्य प्रमाणात असते.

(सोशल मीडियावरुन साभार)