कंबरदुखी घरगुती उपाय जाणून घ्या…

आरोग्य

देशातील 30% गृहिणींना आयुष्यात एकदातरी कंबर दुखीचा त्रासाला सामोरे जावे लागते. वेळीच उपाय न केल्यास आयुष्य भर हा त्रास सहन करावा लागतो.

घरकामात नेहमी खाली वाकणे तसेच जॉब साठी सतत खुर्चीवर बसून काम करणे इत्यादी कारणाने महिलांना व युवतींना कंबर दुखीचा त्रास होतो.

दररोज व्यायाम करणे, सकाळी थोडे फिरण्यास जाणे नियमित योगासने व सोबत संतुलित आहार घेण्यासोबत…

खालील उपायांनी कंबर दुखी च्या त्रासावर आपण मात करू शकतो…

रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेका.

रोज 1 चमचा सुंठवडा खाल्याने खूप फरक पडतो.

मोहरीचे तेल किंवा खोबऱ्याचे तेल यात लसूण घालून ते उकळावे व त्या तेलाने मालिश करावी

आहारात खनिजे, जीवनसत्व असणे आवश्यक आहे म्हणजे कबरेची झीज भरून निघेल व कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर सज्ज होईल.

योगासने केल्याने देखील कंबरदुखी वर खूप फरक पडतो चक्रासन हे आसन नियमित केल्याने जुन्या कंबरेच्या तक्रारी दूर होतात.

जेवण झाल्यावर किंवा सहज म्हणून बडीशोप खातो तसं जवस चावून खावे कम्बरदुखी व गुडघेदुखी ला खूप फरक पडतो.

पांढरे तीळ खाल्याने हाड मजबूत होतात व कंबरदुखी थांबण्यासाठी मदत होते.

तिळाच्या तेलाने मालिश करा फरक पडेल.

पित्ताचा त्रास नसेल तर रोज एक चमचा मेथी दाणे पावडर दोन कप पाण्यात उकळून ते पाणी एक कप झाल्यावर दिवसात चार वेळा घेत जात जा. कम्बरदुखी बंद होईल. तसेच चमचा भर महासुदर्शन चुर्ण चमचाभर दूधात तीन वेळा घ्या वरती गरमपाणी पित जा.