पाय दुखणे आणि त्यावरील घरगुती उपाय

आरोग्य

पायाचं दुखणं म्हणजे काय?

आपले पाय हे हाडं, लिगामेंट्स, टेंडन्स (ligament, tendons) आणि स्नायूपासून बनलेले असतात. या चारही घटकांनी योग्य रितीने काम न केल्यास पाय दुखू शकतात. जेव्हा आपण उभे राहतो किंवा चालतो तेव्हा आपल्या पायांवर दबाव पडतो. ज्यामुळे पाय दुखणंही कॉमन गोष्ट आहे.

पाय दुखण्याची लक्षण

पायाच्या एक किंवा अधिक भागात दुखू लागल्यास किंवा त्रास होऊ लागल्यास पायाचं दुखणं असं म्हटलं जातं. पायाच्या दुखण्यात खालील गोष्टींचाही समावेश होतो.

पायाची बोट दुखणं.

टाचा दुखणं

तळव्याचं हाड किंवा पायाच्या पंज्याचं हाड दुखणं

तळवे दुखणं इ.

हे पायाचं दुखणं कमी किंवा अधिक असू शकतं. एखाद्या दिवशी जास्त वेळ उभं राहिल्यानेही पाय दुखू शकतात. जास्तकरून पायाचं दुखणं हे लवकर बरं होतं. पण कधी-कधी जास्त काळासाठीही हा त्रास जाणवू शकतो.

जर तुमचा पाय खूप काळापासून दुखत असेल आणि कोणत्याही उपायाने आराम मिळत नसेल तर वेळीच डॉक्टरांकडून चेकअप करून घ्या.

खासकरून जेव्हा हे दुखणं एखाद्या जखमेमुळे असेल. अनेक वेळा जखमेचा परिणाम आपल्याला वरवर दिसत नाही. पण अंतर्गत स्नायूंवर याचा परिणाम झालेला असतो. त्यामुळेही पाय दुखू शकतो.

पाय दुखण्याची कारण 

पाय दुखण्याची अनेक कारण असू शकतात. स्नायू आखडणे, स्नायूंचा थकवा, जास्त चालणे, जास्त व्यायाम, स्ट्रेस, ब्लड क्लॉटींगमुळे गाठी होणं, गुडघे,हिप्स आणि पायांमध्ये योग्यरीतीने रक्तप्रवाह न होणं, पाणी कमी पिणं, एकाच जागी जास्त उभे राहणे, आहारात कॅल्शिअम आणि पॉटेशिअमसारख्या व्हिटॅमीन्सची कमतरता, गंभीर जखम होणं किंवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा आजार इ. अनेक वेळा शरीरातील हाडं कमकुवत झाल्यानेही पाय दुखण्याची तक्रार जाणवते.

पाय दुखण्यावर उपाय 

असं म्हणतात की, माणसाच्या पायांमध्ये एकूण 26 हाडं असतात. यामध्ये टाच किंवा पावलाचं हाड म्हणजेच कॅलकेनियस सर्वात मोठं असतं. माणसाच्या टाचेच्या हाडात नैसर्गिकरित्या शरीराच वजन पेलण्याची आणि संतुलित ठेवण्याच्या उद्देश्याने तयार करण्यात आलं आहे. आपण चालतो किंवा धावतो तेव्हा त्याच्या दबाव हे हाड झेलंत जो जमिनीवर पाय ठेवल्याने उत्पन्न होतो आणि नंतरच आपण पुढचं पाऊल ठेवतो.

पायाच्या दुखण्यापासून वाचण्याचे काही सोपे घरगुती उपाय:-

फिश ऑईल

तुम्ही जरी शाकाहारी असलात तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल की, ओमेगा- 3 ऑईल्स (Omega-3 oils) हे नेहमीच आपल्या पाय दुखण्यावर जलद आणि जास्त गुणकारी ठरतात. तुमच्या रोजच्या आहारात फिश ऑईल सप्लीमेंट्सचा समावेश केल्यास तुमचं पायाचं दुखणं लवकर भरेल. तसंच तुम्ही आहारात सीफूडचा समावेश केल्यासही चांगले रिझल्ट्स मिळतील.

वर्कआऊट फॉर फीट

आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या पायाचा 25% भाग हा स्नायूंचा बनलेला आहे. त्यामुळे तुमच्या स्नायूंची काळजी घेणं अत्यतं महत्त्वाचं आहे. योग्य वर्कआऊट केल्यास तुमच्या स्नायूंची क्षमता वाढते.

स्ट्रेचिंग

स्ट्रेचिंग हा तुमच्या स्नायूंमधील तणाव आणि दुखणं कमी करण्याचा सोपा उपाय आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर स्ट्रेचिंग केल्यास तुम्हाला चांगलाच फरक जाणवेल. स्ट्रेचिंगही खरंतर प्रत्येक व्यायामाआधी करण्याची पहिली आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तुम्ही अनेक क्रिडापटूंना एखाद्या खेळाआधी स्ट्रेचिंग करताना पाहिलं असेल. तसंच काहीसं आपल्या दैनंदिन आयुष्यातही महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या क्रिडापटूप्रमाणे आपण दिवसभराच्या शर्यतीत धावतच असतो.

पाय दुखणे कसं टाळाल?

वर आपण पाहिले ते काही सोपे घरगुती आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक बदल. आता पाहूया पायांची काळजी कशी घ्यावी

तुमच्या टाचेला आराम द्या आणि जास्त वजन टाकू नका.

कोणतीही एथलीट अॅक्टीव्हिटी करण्याआधी पहिल्यांदा स्ट्रेचिंगचे व्यायाम नक्की करा. कारण तुमच्या पायाचं संतुलन कायम ठेवण्यासाठी व्यायामामुळे तुम्हाला मदत मिळेल.

चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या ब्रँडच्या चपला किंवा शूज वापरा जे तुमच्या खेळासाठी किंवा दैनंदिन वापरासाठी अनुकूल असतील.

काही वेळा लोक टाच दुखू लागल्यावरसुद्धा जास्त वेगाने चालतात किंवा धावतात. अशावेळी अचानक वेगाने वळू नये. अन्यथा स्थिती गंभीर होऊ शकते.

धावणं, सायकलिंग, स्वीमिंग इ. असे पायांना मजबूती देणारे व्यायाम करा. असं करताना पाय घासले जाऊ नये म्हणून फूट पॅडचा वापर करा.

जेव्हा तुमचा एखादा पाय दुखत असेल तेव्हा तो थोडा वेळ एखाद्या उशीवर किंवा थोडा वर उचलून पडून राहा. एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ उभं किंवा बसून राहू नका. त्यामुळेही बरेचदा पाय दुखू लागतात.

जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या पायांना आराम द्या. कारण कितीही म्हटलं तरी तोही एक महत्त्वाचा अवयव आहे.

पायाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक टेस्ट्स करून घेणे.

पाय दुखण्याबाबत विचारण्यात येणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे (FAQ’s)

1) घरच्या घरी पायांना आराम कसा देता येईल?

तुम्ही खाली दिलेले व्यायाम आणि रिलॅक्सेशन मेजर्स तुमच्या पायांना आराम देण्यासाठी करून पाहू शकता.

तुमच्या पायाच्या बोटांची हालचाल करा.

टाचा जमिनीपासून वर उचला पुन्हा खाली टेकवा.

पायाखाली बॉल घेऊन तो रोल करा.

स्ट्रेचिंग करा

खुर्चीत बसून स्ट्रेचिंग करा

2) दुखऱ्या पायापासून सुटका कशी मिळवावी?

जर तुमचा पाय खूपच दुखत असेल तर लगेच आराम मिळावा यासाठी तुमच फूटवेअर बदला. एकदमच असह्य असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पेन रिलीव्हर घ्या.

3) फूट मसाजनेही त्रास होऊ शकतो का?

फूटमसाजमुळे तुमच्या पायांचे स्नायू मोकळे होतात आणि पाय दुखत असल्यास वेदनाही कमी होतात. पण काही वेळा जास्त वेळ मसाज झाल्यास किंवा योग्य रितीने मसाज न केल्यास तुमच्या पाय दुखू शकतो.

4) मसाज करणं तुमच्या पायासाठी चांगलं आहे का?

जसं तुमच्या मानेला, पाठीला आणि खांद्यांना मसाज केल्यावर बरं वाटतं तसंच काहीसं आहे पायांबद्दल. त्यामुळे पायाच्या स्नायूंना उर्जा देण्यासाठी, रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि स्नायूंचा तणाव कमी करण्यासाठी पायालाही मसाज आवश्यक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)