नाश्ता करणंच बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतात

आरोग्य

नाश्ता करणं का गरजेचं आहे

जेव्हा आपण रात्रीचं जेवण करून झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ तासांचे फास्टींग करतो तेव्हा शरीराला खाण्याची आवश्यकता असते जेणेकरून शरीरात एनर्जी राहील. तुम्ही नाश्त्याला काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार ते अवलंबून असते. ज्यामुळे तुम्हाला उर्जावान आणि हेल्दी राहता येईल.

नाश्ता करणं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतो?

आजकाल जीवनशैली अशी झाली आहे बऱ्याच गोष्टींकडे आपलं लक्ष नसते. कामाच्या ताण-तणावामुळे खाणंपिणं बिघडलं आहे. यामुळे लोक नाश्ता करणं सोडून देतात. त्यांना असं वाटतं की नाश्ता सोडल्यामुळे वेगानं वजन कमी करण्यास मदत होते. असे लोक नाश्त्याला फळं, सॅलेड आणि स्मूदी घेऊ शकतात. ज्यामुळे शरीरात पोषणाची कमतरता भासत नाही.

नाश्ता करणं सोडल्यामुळे मेटाबॉलिक रेट कमी होतो

खासकरून जेव्हा तुम्ही सकाळचा नाश्ता स्किप करता तेव्हा तुमचा मेटाबॉलिज्म स्लो होऊ शकतो, ज्यामुळे वजन वाढतं. वजन कमी करण्यात अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही खूप कमी कॅलरीज घेत असाल तर मेटाबॉलिक रेट स्लो होतो. नाश्ता करणं सोडल्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. इम्यूनिटी कमी होते. सेल्स डॅमेज होतात. शरीराला आजारांशी लढण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. जर तुम्ही एक वेळची पोषक तत्व कमी घेतली तर याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)