marriage

ग्रामपंचायतीचा ठराव! प्रेमविवाहाला लागणार आईवडिलांची परवानगी…

मुलाखत

नाशिक : आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाहला मान्यता देऊ नये, असा ठराव सायखेडा ग्रामपंचायतने केला आहे. ग्रामपंचायतने केलेला ठराव राज्य सरकारकडे पाठवणार आहे. आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेम विवाहला मान्यता देऊ नये यासंदर्भात कायदा करावे, अशी मागणी याद्वारे सरकारकडे केली जाणार आहे.

आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाह केल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. प्रेम विवाहानंतर उद्भवणाऱ्या अडचणींमुळे आई वडिलांची प्रेमविवाहाला संमती असणे आवश्यक असल्याचे या ठरावात मांडण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी राज्यात असा कायदा करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातदेखील कायदा करणे आवश्यक असल्याचे ठरावात मांडले आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये आता प्रेमविवाहासाठी पालकाची परवानगी घेणे बंधनकारक होऊ शकते. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काही दिवसांपूर्वी मेहसाणातील पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात सांगितले की, प्रेमविवाहात ही अट घालण्याच्या मागणीवर कायद्यात विचार केला जात आहे. गुजरातमधील पाटीदार समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की जर एखाद्या मुलाने आणि मुलीने प्रेमविवाह केला तर विवाह नोंदणीच्या वेळी त्यांना किमान एका पालकाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. यामुळे लव्ह जिहादलाही बऱ्याच अंशी आळा बसू शकतो, असा पाटीदार समाजाचा तर्क आहे.

पिंपरी दुमालाचे ग्रामपंचायत सदस्य शरद खळदकर याचं सदस्यत्व कायम

कारेगाव ग्रामपंचायतच्या अजब गावकारभाऱ्यांचा गजब कारभार…

शिक्रापूर ग्रामपंचायतचे राजकारण वेगळ्या वळणावर

सख्या भावांच्या बायकांना ग्रामपंचायत निवडणुकीत समान मते; आणि मग…