cng

पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी महाग…

महाराष्ट्र

नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिलं जात होते. मात्र, सीएनजीच्या दरातही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. नागपूरमध्ये CNG दराचा उडाला भडका आहे. कारण नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकले जात आहे.

नागपूरमध्ये आजचा CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे व डिझेलचे दर 92 रुपये 60 पैसे आहे. देशातील सर्वात महागडी CNG हे नागपूरमध्ये ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. मुंबईत सीएनजी 80 रुपये दराने विकले जात आहे.

CNG वितरण कंपनी ग्राहकांना सरकारी सबसिडी न देता गॅस विकत असल्याचा ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे एवढ्या महाग दरात सीएनजी विकत घ्यावा लागत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. नागपूरचे CNG वितरणाचे कंत्राट हरियाणा गॅस डिस्ट्रीन्यूटरकडे आहे.

राज्यातील नाहीतर देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात विकला जात आहे. तर राज्यातील सर्वात स्वस्त सीएनजी हे नाशिकमध्ये विकलं जात आहे. नाशिकमध्ये सीएनजीचे दर 67.90 रुपये आहे. महाराष्ट्रात सीएनजी सरासरी 82.60 रुपायांना विकलं जात आहे.

राज्यातील विविध शहरातील सीएनजीचे दर
>> मुंबई- 80 रुपये
>> पुणे- 85 रुपये
>> ठाणे- 80 रुपये
>> नाशिक – 67.90 रुपये
>> नवी मुंबई- 80 रुपये
>> पिंपरी चिंचवड- 85 रुपये
>> धुळे- 67.90 रुपये