पोटाच्या मालिश चे फायदे

आरोग्य

पोट दुखण्यामागे अनेक कारणं असू शकतात. बाहेरचं खाणं, अपचन, पोट साफ न होणे किंवा आतड्यांवरील सूज यापैकी कशानेही पोट दुखू शकते. अनेकदा बाकीच्या पथ्य पाण्यामुळे आपण पोटातून औषधं नाही घेऊ शकत अशा वेळी पोटाची मालिश हा पर्याय उत्तम ठरतो.

काय आहेत पोटाच्या मालिशचे फायदे…?
१) पोटाची मालिश केल्याने पचनक्रीया वाढते. वजन कमी करण्यासाठी हे खुप फायदेशीर आहे.
२) पोटाची मालिश केल्यावर पोटाच गॅस होत नाही आणि पचन क्रीया चांगली राहते.
३) पोट साफ होण्यास देखील पोटाची मालिश करणे फायदेशीर ठरते.
४) आतडे आखडून गेले आहेत असं वाटत असेल तरी पोटाची मालिश केल्याने आराम मिळतो.
५) मालिश करतांना लवंग, लेवेंडर किंवा दालचीनीचा वापर केल्याने मासिक पाळीच्या वेदनांपासुन सुटका होते.