काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांचा जाहीर निषेध…

महाराष्ट्र

सीद्धीकीनी तत्काळ माफी मागावी; शितल करदेकर

मुंबई: महिला कुस्तीपट्टूच्या समर्थनार्थ काँग्रेसने आज मुंबईत केलेल्या आंदोलनादरम्यान माय महानगरचे पत्रकार स्वप्नील जाधव काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया घेत होते त्यावेळी आमदार झिशान सिद्दीकी यांनी लाईव्हदरम्यान मध्ये हात टाकून रोखण्याचा प्रयत्न केला. लाईव्ह सुरू असल्याने स्वप्नील जाधव यांनी त्यांचा हात बाजूला केला, या गोष्टीचा राग मनात धरून लाईव्ह संपल्यानंतर स्वप्नील यांना आमदार झिशान सिद्दीकी यांनी ‘पुन्हा अस केलंस तर हात तोडून हातात देईन’ अशी धमकी दिली.

लोकप्रतिनिधी असूनही सिद्दीकी यांचे हे वागणे अशोभनीय आहे. पत्रकाराला धमकी देण्याच्या सिद्दीकी यांच्या कृतीचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया जाहीर निषेध करत आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनी या गोष्टीबद्दल माफो मागावी, अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (MIA) वतीने करत आहोत. पत्रकार स्वप्नील जाधव याच्या सोबत आम्ही आहोत, अशी स्पष्ट भूमिका एम ए आय संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी व्यक्त केली आहे.