महापौर ना मंत्रालयात केबिन द्या; आदित्य ठाकरे

महाराष्ट्र

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील बाजार समिती आणि शिक्षण समितीच्या केबिन पालिका प्रशासनाने पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. मिंधे सरकार च्या आदेशाने महापालिका प्रशासनान मुंबईच्या पालकमंत्र्यांना स्वतंत्र केबिन दिल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा शिवसेना नेते, युवासेनाध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय.

महापालिका कायदा 1888 नुसार मुंबई महापालिका स्वतंत्र प्राधिकरणानुसार कार्यरत आहे. या कायद्याची पायमल्ली केली आहे. पालकमंत्र्यांचा थेट संबंध जिल्हाधिकाऱ्यांशी येतो. पण महापालिकेत पालकमंत्र्यांना केबिन देऊन मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या कामात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न मिंधे सरकारचा सुरू झालाय. बिल्डिंग प्रपोजल च्या कामासाठी मंत्र्यांना केबिन दिली जात असतील तर माझी मागणी आहे की प्रत्येक महापौर ना मंत्रालयात केबिन द्या.आम्हा मुंबईच्या सगळ्या आमदारांना महापालिकेन केबिन द्यावी.