महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार; अंबादास दानवे

महाराष्ट्र

मुंबई: खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात केला.

सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार त्या हॉस्पिटलमध्ये होते, अशी माहिती देत आहेत. परंतु ते कुठेही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नव्हते. मी स्वतः तिथे जाऊन ही माहिती घेतली असल्याचे दानवे म्हणाले.

सांस्कृतिक कार्यमंत्र्यांबरोबर गृहमंत्र्यांनी सुद्धा या घटनेवर प्रतिक्रिया दिली पाहिजे होती. या दुर्घटनेच्या संदर्भात गठीत समितीचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. सरकारने रुग्णवाहिका, पारिचारिका व डॉक्टर यांचा यावेळी बंदोबस्त केलेला होता तर घटनेवेळी या यंत्रणा कुठे होत्या असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा एका विचाराला दिलेला पुरस्कार होता. सरकारने किंवा खाजगी संस्थेने हा सोहळा आयोजित केला होता याची माहिती, मंत्री महोदयांनी दिली पाहिजे. जर एका राजकीय पक्षाने किंवा खाजगी संस्थेने हा सोहळा आयोजित केलेला असता आणि त्यामध्ये एवढे बळी गेले असते तर सरकारने याकडे दुर्लक्ष केले असते का? असा सवाल देखील अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

हॉस्पिटलच्या व्यवस्थेकडे आपण बघितले तर रुग्ण प्राथमिक उपचार घेण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यानंतर पुढील उपचार घेण्यासाठी ते एमजीएम हॉस्पिटलमध्ये गेले. स्त्री सदस्यांचे संस्कार असे आहेत की, ते आपल्या गुरूंच्या विचारांवर विश्वास ठेवून कधीही कोणत्याही घटने बाबतीत तक्रार करत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक सुद्धा तक्रार करत नाहीत. त्यामुळे सदर घटनेबाबत कोणी तक्रार केली नाही म्हणून सरकारने कोणती कार्यवाही करायची नाहीत का ? असा प्रश्न विचारत दानवे यांनी सरकारला जाब विचारला. या दुर्घटनेची चौकशी करण्यासंदर्भात जी समिती गठीत करण्यात आलेली आहेत तिला वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. दुर्घटनेत बळी गेलेल्या लोकांच्या मृत्यु बाबतीत सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा विषय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचा न राहता गृह मंत्रालयाचा हा प्रश्न बनतो असे दानवे म्हणाले.

विधिमंडळाच्या सचिवांनी गृह विभागाला सुद्धा सूचना देणे आवश्यक होते. सदर कार्यक्रम होण्यापुरता मर्यादित सांस्कृतिक कार्य विभागाचा हस्तक्षेप आहेत. त्यानंतर तपास करणे हे गृह मंत्रालयाचे काम आहे. या चर्चेवर गृह मंत्रालयाचे सुद्धा उत्तर देणे अपेक्षित असल्याचे दानवे यांनी म्हटले.