HSRP नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रात ऑनलाइन अर्ज कसा करावा  

महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) अनिवार्य केली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी 31 मार्च 2025 ही अंतिम तारीख आहे. ही नंबर प्लेट वाहन चोरी टाळण्यासाठी आणि डुप्लिकेट नंबर प्लेट रोखण्यासाठी आवश्यक आहे.

HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन प्रक्रिया (A to Z)

स्टेप 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या

गुगलवर HSRP Number Plate Maharashtra असे सर्च करा.

महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट https://transport.maharashtra.gov.in ओपन करा.

होमपेजवर “Apply High Security Registration Plate Online” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप 2: कार्यालय निवडा आणि अर्ज भरा

तुमच्या शहरातील HSRP नंबर प्लेट सेवा केंद्र निवडा.

Apply हसर्प वर क्लिक करा.

Order HSRP वर क्लिक करा.

वाहनाचे तपशील भरा:

गाडीचे रजिस्ट्रेशन नंबर

चेसिस नंबरचे शेवटचे ५ अंक

इंजिन नंबरचे शेवटचे ५ अंक

मोबाईल नंबर

स्टेप 3: पेमेंट प्रक्रिया

अर्ज सबमिट केल्यानंतर पेमेंट पेज ओपन होईल.

तुम्ही UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंग द्वारे पेमेंट करू शकता.

HSRP नंबर प्लेटसाठी शुल्क:

दुचाकी, ट्रॅक्टर ₹450 +GST

तीनचाकी ₹500+GST

चारचाकी व इतर मोठी वाहने ₹745+GST

पेमेंट केल्यानंतर तुम्हाला SMS आणि ई-मेल द्वारे कन्फर्मेशन मिळेल.

स्टेप 4: नंबर प्लेट बसवण्याची वेळ बुक करा

अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही HSRP प्लेट फिटिंगसाठी तारीख आणि वेळ बुक करू शकता.

ठरलेल्या दिवशी आरटीओ किंवा अधिकृत एजन्सीच्या केंद्रात जाऊन नंबर प्लेट बसवून घ्या

HSRP नंबर प्लेटसंबंधी महत्त्वाची माहिती 

31 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर HSRP नसेल तर दंड भरावा लागू शकतो.

HSRP प्लेटमध्ये QR कोड आणि लेझर मार्किंग असते, जे चोरीपासून संरक्षण देते.

कोणत्याही अप्रत्यक्ष एजंट किंवा दलालांशी संपर्क साधू नका.

पेमेंट केल्यानंतर 7 ते 15 दिवसांच्या आत HSRP प्लेट उपलब्ध होते.