आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका…

महाराष्ट्र
औरंगाबाद: औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील व शिंटे गटातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

संजय शिरसाट यांना औरंगाबादहून उपचारासाठी मुंबईला आणण्यात येतय. एअर अंबुलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला रवाना करण्यात आलंय. काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र 24 तासांच्या आतच त्यांना औरंगाबादहून मुंबईल उपचारासाठी नेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने दिल्यामुळे त्यांना मुंबईतल्या रुग्णालयात हलवण्यात आल आहे.

सोमवारी रात्रीच्या सुमारास आमदार शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबाद शहरातील सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने पुढील उपचारासाठी आमदारा शिरसाट यांना आज मंगळवारी सकाळी राज्याची राजधानी मुंबईकडे हलवण्यात आले आहे.

माजी मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात संजय शिरसाट सहभागी होते. औरंगाबाद पश्चिममधून शिरसाट निवडून आलेले आहेत. तीन वेळा म्हणजेच विजयाची हॅट्ट्रिक त्यांनी साधलेली आहे. संजय शिरसाट हे अनेक दिवसांपासून अस्वस्थ आणि नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळेही राजकीय वातावरण तापलं होतं. अशातच आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी घडामोड समोर आली आहे.