तीस-तीस घोटाळ्यात अंबादास दानवेंचे नाव?

महाराष्ट्र

१९ जानेवारीला मोठा गौप्यस्फोट करणार दानवेंचा इशारा…

औरंगाबाद: औरंगाबाद येथे गेल्या वर्षी ‘तीस तीस’ घोटाळा गाजला होता. या घोटाळ्यात आता इंडीने एंट्री घेतली आहे. या घोटाळ्याची माहिती ईडीने मागितली असून या घोटाळ्याचा तपास आता इंडी करणार असल्याची माहिती आहे.

औरंगाबादेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मागील वर्षी राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्यात दानवे यांचे नाव समोर येत आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याची ‘ईडी’ने माहिती मागवली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी संतोष राठोडकडे पोलिसांना तीन डायऱ्या मिळाल्या होत्या. ज्यात अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती समोर आहे. त्यामुळे दानवे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

या घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना मुख्य आरोपी संतोष राठोडकडे सापडल्या होत्या. ज्यात पैसे गुंतवणूक करणाऱ्या लोकांची नावे होते. तर याच नावांच्या यादीत अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जर या घोटाळ्याची ईडीने चौकशी केली तर, दानवे यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

माझं नाव नाही; अंबादास दानवे

तीस-तीस घोटाळ्यात अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा समोर आल्याने आमच्या प्रतिनिधी यांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. तर ‘त्या डायरीत माझं नाव नाही, कोणी दुसरा दानवे असेल.’ असा खुलासा दानवे यांनी केला आहे.

तसेच मी साधा शिवसैनिक आहे मला राहायला स्वतःचे घर नाही मी वडिलांच्या घरात राहतो तुम्ही बरेच लोक माझ्या घरी येत असतात. आज नाही वर्षानुवर्ष आपण येत असतात तुम्हाला सर्व स्थिती माहित आहे मला असं वाटतं बँका उपलब्ध आहे सगळं अकाउंट समोर असते मी अशा कोणत्याही डबल ट्रिबल चारपट होणाऱ्यावर विश्वास ठेवत नाही. असे लोक येतात मी त्यांना परत सांगत असतो झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गात पडू नका असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, याचा तपास झाला तरी माझे हरकत काहीच नाहीये त्यांनी तपास करावा, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.