आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच करता येणार रेशनसाठी ई-केवायसी

महाराष्ट्र

संभाजीनगर: सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक केलं असून यासाठी शासनाने ‘मेरा ई-केवायसी’ ॲप सुरू केलं आहे. त्यामुळे, आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता, काही मिनिटांत स्वतःचं आणि त्यांच्या कुटुंबाचं केवायसी पूर्ण करू शकतात. यासाठी फक्त तुमचा आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणं गरजेच आहे.

ई-केवायसी कशी कराल (Step-by-Step मार्गदर्शन)

१) ॲप्स डाउनलोड करा: 

Mera E-KYC Mobile App:  https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth

Aadhaar Face RD Service App: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd

२) ॲप्स इन्स्टॉल करून सेटअप करा:

दोन्ही ॲप्स इन्स्टॉल झाल्यावर, त्यांना आवश्यक त्या परवानग्या (permissions) द्यायला विसरू नका.

३) Mera E-KYC ॲप उघडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा:

राज्य: ‘महाराष्ट्र’ निवडा.

आधार क्रमांक: तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाका.

OTP प्रविष्ट करा: तुमच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP (वन-टाइम पासवर्ड) टाका.

कॅप्चर: स्क्रीनवर दिसणारा कोड काळजीपूर्वक नोंद करा.

४) चेहऱ्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication): 

स्वतःसाठी: मोबाईलचा पुढचा (front) कॅमेरा सुरू करून तुमचा चेहरा स्कॅन करा. स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा.

दुसऱ्या व्यक्तीसाठी: जर तुम्ही कुटुंबातील दुसऱ्या सदस्याचं केवायसी करत असाल, तर मागील (back) कॅमेरा वापरा.

५) सत्यापन पूर्ण

जर पडताळणी यशस्वी झाली, तर लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल.

याची खात्री करण्यासाठी, ॲपमध्ये “E-KYC Status” तपासा.

जर “E-KYC Status – Y” असं दिसत असेल, तर तुमची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे! अभिनंदन

लक्षात ठेवा

ही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

जर तुम्ही महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित असाल, तर IMPDS KYC पर्याय वापरा.

शेवटची तारीख: ३० जून २०२५ पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी, हे लक्षात ठेवा.