संभाजीनगर: नवोदय विद्यालय समितीने (NVS) शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पालकांनी वेळेवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुठे कराल अर्ज
अधिकृत वेबसाइट: https://navodaya.gov.in
थेट अर्ज लिंक: https://cbseitms.rcil.gov.in/nvs
शैक्षणिक पात्रता
विद्यार्थ्याने इ. 5 वी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळेत शिकलेले असावे.
विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2014 ते 31 जुलै 2016 दरम्यान झालेला असावा.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खास आरक्षण एकूण जागांपैकी 75% जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
अर्ज कसा कराल
1) अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://navodaya.gov.in
2) “Class VI JNVST 2026-27” या लिंकवर क्लिक करा
3) विद्यार्थ्याची माहिती, पालकांची माहिती नीट भरावी
4) आवश्यक कागदपत्रे (जन्म प्रमाणपत्र, शाळा दाखला इ.) अपलोड करा
5) अर्ज पूर्ण तपासून सबमिट करा
6) प्रिंटआउट घेऊन भविष्यासाठी सुरक्षित ठेवा
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू: २ जून २०२५
अंतिम तारीख: २९ जुलै २०२५
प्रवेश परीक्षा (पहिला टप्पा): १३ डिसेंबर २०२५
दुसरा टप्पा: ११ एप्रिल २०२६