sheetal kardekar

शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र

पुणे: आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त‘ शिवाजीनगर येथील लकाकी रस्त्यावरील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ येथे अनेक मान्यवरांचा सत्कार आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आला. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म संवत्सर वर्षानिमित्त न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी धाडसी पत्रकार शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

खासदार श्रीनिवास पाटील, वक्ता दशसहस्त्रेषु आचार्य अत्रेपुरस्कार यांना क-हेचे पाणी बृहत् आत्मचरित्र आचार्य अत्रे पुरस्कार रामभाऊ नाईक, माजी राज्यपाल, उत्तर प्रदेश यांना त्यांच्या कर्मयोद्धा आणि चरैवैती चरैवैती या आत्मकथनासाठी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक,खा.श्रीनिवास पाटील, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबुराव कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संयुक्त महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान , पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी ,त्याचे कार्य पूर्तीसाठी मुंबईत उचित स्मारक व्हावे अशी आग्रही भूमिका अॅड बाबुराव कानडे यांनी मांडली. या साठी कृतीशील सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या पुरस्काराला उत्तर देताना शीतल करदेकर यांनी म्हटले की, “हा पुरस्कार माझ्यासाठी शाबासकी आहे. अत्रे प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा अ‍ॅड बाबुराव कानडे यांचे आभार त्यांच्या कार्यात नेहमीच सहकार्य राहील. तसेच देश व राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य करताना म्हटले की,

“अशी राजकीय परिस्थिती आजवर महाराष्ट्राने कधीही पाहिली नाही ,अनुभवली नाही, इतकं राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ खिळखिळे झालेत.

न्यायमूर्ती पत्रकाराच्या जबाबदारीबद्दल बोलतात ते योग्यही आहे,पण पत्रकारांची वाईट अवस्था होते आहे,आवाज दाबला जातोय, त्यावर ते का बोलत नाहीत…? चौथ्या स्तंभावर अनेक संकटं आलीयेत, त्यावर कुणी गंभीर नाही. हे अत्यंत भयंकर आहे. जनता विविध प्रश्नांवर जेव्हा बोलेल तेव्हा लोकांचा वेळ व पैसा वाया घालणाऱ्यांना पळता भुई थोडी होईल. या तीन दिवस सुरू असलेल्या “हास्य विनोद महोत्सवा” ची सांगता विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पुरस्कार प्रदानाने करण्यात आली.

पुरस्कार पुढील प्रमाणे

केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कार- डॉ गणेश घनश्याम बोरकर (खेळिया- काव्यसंग्रह)

आद्य विडंबनकार आचार्य अत्रे पुरस्कार – अमोल केळकर (माझी टवाळकी)

विनोदसम्राट आचार्य अत्रेपुरस्कार- सॅबी परेरा (टपालकी)

वक्ता दशहस्त्रेषु आचार्य पुरस्कार – खासदार श्रीनिवास पाटील

सिद्धहस्त व्यंगचित्रकार आचार्य अत्रे पुरस्कार – भरत जगताप ,बेळगाव

श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे पुरस्कार संकर्षण कराडे ( नाटके- तू म्हणशील तसं व सारखं काहीतरी होतंय )

थोर रंगकर्मी अभिनेता आचार्य अत्रे पुरस्कार- अभिनेते अजित केळकर

थोर रंगकर्मी अभिनेता आचार्य अत्रे पुरस्कार- अभिनेत्री मानसी मागिकर

पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार- धाडसी पत्रकार शीतल करदेकर

उद्योगपती आचार्य पुरस्कार- उद्योजक वर्धमान तरवडे

मी कसा झालो…? अक्षर वाङ्मय आचार्य अत्रे पुरस्कार- लेखक नाटककार आनंद म्हसवेकर (कोणा एकाची रंगयात्रा)

श्यामची आई आचार्य अत्रेपुरस्कार- मधुकर उमरीकर

मी कसा झालो? आचार्य अत्रेपुरस्कार-निलेश साठे(साठा उत्तराची कहाणी)

तसेच संजीव वेलणकर (दिनविशेष), उल्हास कार्लेकर (अत्रेभक्त),धनराज वंजारी (भारतीय घटनेचे निरूपणकार) यांचे विशेष सत्कार करण्यात आले. शाल श्रीफळ , स्मृतिचिन्ह आणि २५०१ रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप होते.