Balrangbhumi Saradwadi

नाट्यछटा स्पर्धेमध्ये सरदवाडीत तब्बल २८३ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग!

शिरूर तालुका

शिरूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यछटा स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्रातील रसिक जनतेला यामधूनच पुढे अभिनेते, कलाकार पहायला मिळतील. मी सुद्धा कलेचा, कलाकारांचा कदर करणारा कार्यकर्ता आहे. शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास शाळा करत आहेत. ही कौतुकास्पद व आभिमानाची गोष्ट आहे, असे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बालरंगभूमी परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी म्हटले आहे.

बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन सरदवाडी येथील अभिनव विद्यालयात करण्यात आले होते. यावेळी १८ शाळांमधील २८३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. २८ विद्यार्थी अंतीम फेरीत पोहोचले असून, १२ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. यावेळी श्री. लंके बोलत होते. बालरंगभूमी परीषद पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षा दीपाली शेळके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, शिरूर पंचायत समितीचे सदस्य आबासाहेब सरोदे, सरदवाडीचे सरपंच विलासराव कर्डिले, कर्डेलवाडीचे सरपंच राजेंद्र दसगुडे, रामलिंगचे माजी सरपंच तुषार दसगुडे, श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष सुदाम चव्हाण, सचिव दशरथ लांडगे, सचिव कांतीलाल टाकळकर, संचालक शिवाजी रणसिंग, खजिनदार काळूराम चव्हाण, ह.भ. प. रामभाऊ सरोदे, अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण गोरडे, प्राचार्य संजीव मांढरे, प्राचार्य दिलीप पवार, मुख्याध्यापिका शोभा भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा शिरूरचे कोषाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सुर्यकांत पलांडे म्हणाले, ‘विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत नाट्य, खेळ, गायन, वादन, वक्तृत्व अशा विविध कला शिकवल्या तर त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळेल. त्यामधूनच पुढे चांगले कलाकार, खेळाडू, लेखक तयार होतील. विद्यार्थ्यांचा सर्वांगणी विकास होण्यासाठी अशा स्पर्धा शालेय पातळीवर आयोजित केल्या पाहिजेत. यामुळे निवडक विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हा पातळीवर चमकायची संधी मिळेल.’

दीपाली शेळके म्हणाल्या, ‘गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये ताल तोल आणि लय सांभाळण्याचा सामर्थ्य कला देते. नाट्य विष्करातून व्यक्तिमत्व विकास होतो हे आता सिद्ध झाले आहे. शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास शाळा करत असून ही कौतुकास्पद व आभिमानाची गोष्ट आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्यास ते नक्कीच पुढे जातील. यासाठी बालरंगभूमी काम करत आहे. नाट्यछटा स्पर्धेसाठी जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेसाठी शाळेतील मान्यवरांबरोबरच अनेकांनी मदत केल्यामुळेच कार्यक्रम यशस्वी झाला. विद्यार्थ्यांसाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांसाठी मदत मिळाली तर विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल घडेल.’

दीपाली शेळके यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आमदार निलेश लंके, सूर्यकांत पलांडे यांनी आभार मानून त्यांना शुभेच्छा दिल्या. शिरूर येथील उद्योजीका वंदना पोटे यांनी विद्यार्थ्यांसह ३५० जणांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. स्वयंसेवकांनी केलेले स्वागतामुळे मान्यवर भारावून गेले होते. शिवाय, स्वागत गीत, रांगोळ्यांनी परिसर सुशोभीत करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम खामकर, संदीप सरोदे यांनी केले. मुख्याध्यापक अरुण गोरडे यांनी आभार मानले.

परिक्षक म्हणून ज्येष्ठ नाट्य चित्रपट अभिनेते अरुण पटवर्धन, ज्येष्ठ नाट्य चित्रपट अभिनेते चंद्रशेखर भागवत, ज्येष्ठ नाट्य अभिनेते दिलीप अष्टेकर, नाट्य कलाकार नितीन महाजन, संभाजी मालिका फेम अभिनेत्री संपदा देवधर, अभिनेत्री मंजुषा जोशी, नाट्य संगीत संयोजन अभिजीत इनामदार, नाट्य तंत्रज्ञ प्रसाद कुलकर्णी, बालनाट्य लेखक, अभिनेते, दिग्दर्शक देवेंद्र भिडे, नृत्यदिग्दर्शक योगेश देशमुख, संजीव मांढरे यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाळासाहेब शेळके यांनी मेहनत घेतली.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणेः
व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर
1) मायरा कर्नावट
2) पार्थ पवार
3) अथश्री फुलफगर
4) जैनम कर्नावट
5) आर्यन होळकर
उत्तेजनार्थ
6) अंशिका जोशी
7) आरोही कटारिया

स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे
१) धनश्री शिंदे
२) खुशी भुजबळ
३) श्रावणी गाडे
उत्तेजनार्थ
१) सार्थक पाटील
२) सानिका भूमकर

विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी
1) पायल विधाटे
2) ईश्वरी बोकले
3) साक्षी कुंभार
उत्तेजनार्थ
1) अंकिता जायकर

विद्याधाम प्रशाला शिरूर
1) ऋत्वा जावळे
2) संस्कृती वेताळ
3) आर्यन रुपनर
उत्तेजनार्थ
१) योगश्री वर्पे

विद्याधाम हायस्कूल कानूर मेसाई मेसाई
1) अपेक्षा शेळके
उत्तेजनार्थ
1) सोहम मोरे

गुरुवर्य शंकरराव भुजबळ इंग्लिश मेडीयम स्कूल, शिरूर.
उत्तेजनार्थ
1) सारा सय्यद

तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी
उत्तेजनार्थ
1) शरण्या कणसे

अभिनव विद्यालय सरदवाडी
१) सुहानी क्षिरसागर
२) लक्षमी जाधव
उत्तेजनार्थ
१) प्रिती दसगुडे
२) ऋतुजा सरोदे

जॉयस इंग्लिश मिडीयम स्कूल चाकण
1) श्रीमई सुजित बनकर
२) तन्वी सचिन जगताप

आर. एम.धारीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरूर.
1) नक्षत्रा पटवर्धन
2) अनुष्का तंटक
3) श्रावणी बनकर
4) अलोक शेलार
5) शौर्य वाळसे
6) पायल मस्के
उत्तेजनार्थ
१) वेदांती वाखारे
२) आर्या चव्हाण

महागणपती ग्रुप ऑफ स्कूल रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे
1) अनुरा मांढरे
2) ओमकार कळंत्रे

उत्तेजनार्थः
१) अंजली भोसले
२) ओंकार करंजे