सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

महाराष्ट्र

मुंबई: मुंबईच्या नागरी आणि प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन Bombay Municipal Corporation चे अध्यक्ष राहिलेले सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती आज मुंबई महानगरपालिकेत साजरी करण्यात आली.

महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात असलेल्या डॉ. भाटवडेकर यांच्या अर्धपुतळ्यास महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

मुंबईच्या नागरी प्रशासनाच्या बळकटीकरणात आणि शहराच्या सर्वांगीण विकासात डॉ. भाटवडेकर यांनी दिलेल्या योगदानाची उपस्थितांनी आठवण करून दिली.या कार्यक्रमास ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त श्री. जयदीप मोरे, महानगरपालिका उपसचिव श्री. सुशील महाजन तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.