भावाच्या अंत्यदर्शनाला आलेली बहीणही काळाच्या पडद्याआड

कणेगाव: वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे एका पाठोपाठ घडलेल्या दोन मृत्यूंनी संपूर्ण गाव हादरून गेले आहे. सत्तर वर्षांचे राजेंद्र गोविंद पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या बहिणीचाही दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे कणेगावसह बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. कणेगावचे रहिवासी राजेंद्र गोविंद पाटील (वय 70) यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. शनिवारी […]

अधिक वाचा..

लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे हृदयविकाराने निधन

पुणे: लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने पुणे ग्रामीण पोलिस दलासह वाघोली–लोणीकंद परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्री सुमारे १० वाजता ड्यूटी पूर्ण करून ते वडगावशेरी येथील निवासस्थानी परतले होते. मध्यरात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अधिकारी मोहन जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव: उमरगा तालुक्यातील तलमोड येथे 26 जानेवारी रोजी झालेल्या शासकीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन दारूबंदी विभागाचे अधिकारी मोहन जाधव यांचा मृत्यू झाला. घटनेवेळी अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक झेंडावंदनासाठी उभे होते. राष्ट्रगीत सुरू होण्याच्या क्षणी मोहन जाधव अचानक कोसळले. तातडीने उपस्थितांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांच्या हाती काही होऊ शकले […]

अधिक वाचा..

मराठमोळा रिल स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचे निधन

मुंबई: मराठमोळा रिल स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. प्रथमेश गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, आणि आज त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावरून ही दु:खद बातमी सर्वांना दिली आहे. त्यांच्या अचानक निधनाने त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रथमेश कदम आणि त्यांची आई प्रज्ञा कदम यांचे सोशल […]

अधिक वाचा..

अखेरच्या क्षणापर्यंत सुटली नाही साथ; पतीच्या निधनानंतर अवघ्या 20 मिनिटात पत्नीनेही सोडले प्राण

वहागाव: पती- पत्नीचे नाते हे अतूट आणि एकमेकांचे आयुष्य व्यापून टाकणारे असते. चुकूनही मी तुझा हात सोडणार नाही, असे वचन एकमेकांना देत ते निभवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात; पण मृत्यूनंतरही एकमेकांची साथ सोडत नाहीत, अशा काही अपवादात्मक घटना कुठेतरी घडल्याचे कानावर पडते. तळबीडलाही (गुरुवार) अशीच घटना घडली. आयुष्यभर साथ देणाऱ्या पतीच्या निधनानंतर अवघ्या २० मिनिटांतच पत्नीनेही […]

अधिक वाचा..

त्या वीस दिवसांची चिमुकलीला दूध पाजतानाच आईन सोडले प्राण

कोल्हापूर: वीस दिवसांची चिमुकली पीयुषाला दूध पाजतानाच आई रचना स्वप्नील चौगले (वय २७, रा. संभाजीनगर स्टँडजवळ, कोल्हापूर) बेशुद्ध झाल्या. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठले. बुधवारी (दि. २३) पहाटे ही घटना घडली. रचना यांच्या दोन मुली आईच्या मायेला पोरक्या झाल्या. अचानक घडलेल्या घटनेने चौगले कुटुंबीयांना धक्का […]

अधिक वाचा..

विकास सावंत यांच्या निधनाने समर्पित व अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: काँग्रेस पक्षाचे नेते, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विकास सावंत यांच्या निधनामुळे एक समर्पित व अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. विकास सावंत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, विकास सावंत हे काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक होते. […]

अधिक वाचा..

स्त्री आधार केंद्राचे कार्यकर्ते आर.डी शेलार यांचे दुःखद निधन…

शेलार गुरुजी हे आंबेडकरी चळवळीचे खरे सुपुत्र होते; डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई: रमेश शेलार उर्फ आर.डी. शेलार गुरुजी यांच (दि. २८) जुलै सकाळी दुःखद निधन झाले. ते १९८१ सालापासून स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यांच्या या कामाबरोबरच त्यांनी किर्लोस्कर कमिन्स कंपनीमध्ये कामगार […]

अधिक वाचा..

करडे येथील राजाराम जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

शिरुर (तेजस फडके): करडे (ता.शिरुर) येथील राजाराम विठ्ठलl जाधव यांचे शुक्रवार (दि 13) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, २ मुले, ३ मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांचा एक मुलगा व सून सध्या युरोपमधील डेन्मार्क देशामध्ये नोकरीला असून, दुसरा मुलगा आणि एक जावई पुणे शहर पोलीस दलात नोकरीला आहे. […]

अधिक वाचा..

21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं निधन

मुंबई: शरीर सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचा संदेश देण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या इंडो-कॅनेडियन टिक टॉकरच निधन झाल आहे. मेघाच (वय 21) होते. तिच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आई-वडिलांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. या बातमीमुळे तिचे चाहत्यांना आणि मित्र-परिवारालाही मोठाी धक्काच बसला. सोशल मीडियावर तिच्या अचानक जाण्यामुळे शोक व्यक्त केला जात आहे. मेघा ठाकुरच्या आई-वडिलांनी पोस्ट […]

अधिक वाचा..