बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर आज सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. मात्र या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पवार गटात दोन गट स्पष्टपणे दिसून आले.
अजित पवार यांच्या गटातील नेते मुंबईत असताना शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार बारामतीत थांबले होते. शपथविधीनंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी गेल्या होत्या आणि मातोश्री आशा पवार यांची तब्येत विचारली. सुळे म्हणाल्या, “उद्या देशाचं आर्थिक बजेट सेशन असल्याने दिल्लीला जाणं गरजेचं आहे. सभागृहाची गटनेते असल्यामुळे परवानगी घेण्यासाठी आलो.”
दरम्यान, शपथविधीच्या वेळी पवार गटातील नेत्यांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हात जोडून ‘रामकृष्ण हरी’ असे म्हणत उत्तर टाळले.
याच दरम्यान, रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचे मुळगाव तरडगाव येथे नातेवाईकांना सांत्वन दिले. बारामती विमान अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यात अजित पवार आणि त्यांचा पीएसओ विदीप जाधव यांचा समावेश होता.