त्या 70 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही पंतप्रधान सन्मान योजनेचे लाभ, कारण…

महाराष्ट्र

औरंगाबाद: संभाजीनगर जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ७४४ शेतकऱ्यांपैकी ७०,२१४ शेतकऱ्यांचे पंतप्रधान सन्मान योजनेच अंतर्गत इ-केवायसी झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेच्या निधीपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुरु करण्यात येणाऱ्या नमो योजनेच्या लाभापासून देखील हे शेतकरी वंचित राहणार आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय केवायसी बाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी

संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १३,७२९ शेतकऱ्यांचा केवायसी करणे बाकी आहे. तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात – ७५००, गंगापूर -८३००, कन्नड- ७६००, खुलताबाद -२७९४, पैठण- १२९२२, फुलंब्री- ५०७४, सिल्लोड- ७७३२, सोयगाव -३४३० शेतकऱ्यांची केवायसी बाकी असल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.

यामध्ये २१४७१ शेतकऱ्यांचे जमीनीचे बाबतचा कागदपत्राची जोडणी केलेली नाही. तर २८ हजार शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार लिंक केलेले नाही. यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे मोबाईल नंबर खात्याला लिंक केलेले नाहीत. तर आधार नंबर चुकलेले आहे. त्याच्यामुळे आधार व्हेरीफाय होत नाही. त्यामुळे केवावयसी करण्यात अडचणी येत आहे.

शेतकऱ्यांनी ई केवायसी करुन घ्यावी

जिल्ह्यात पंतप्रधान पीक सन्मान योजनेचा तीन लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेकदा केवायसी करण्यासाठी शिबीर लावण्यात आली आहेत. मोबईल नंबर अपडेट करणे तसेच आधार लिंक करणे या प्रक्रिया शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी केले आहे.