राज्य सरकारच्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत 1 रुपयाही न देता अशी करा वारसनोंद

महाराष्ट्र

मुंबई: महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ ही विशेष मोहीम सुरू केली असून, यामध्ये तुम्ही आता सहजपणे व मोफत वारसनोंद करू शकता.

कोणत्या कागदपत्रांची गरज आहे.

वारसनोंदीसाठी अर्जासोबत पुढील कागदपत्रे तलाठ्यांना द्यावी लागतील

1) मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला

2) वंशावळीसह प्रतिज्ञापत्र

3) सरपंच व पोलिस पाटलांची स्वाक्षरी असलेले प्रपत्र-५

शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे नियम

ग्रामीण भागातील अर्जदारांसाठी:

साध्या कागदावरील प्रतिज्ञापत्र चालेल

प्रपत्र-५ मध्ये सरपंच आणि पोलिस पाटलांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक

शहरी भागातील अर्जदारांसाठी:

१०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र आवश्यक

हे प्रतिज्ञापत्र महा ई-सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र येथे करावे

प्रतिज्ञापत्रात लिहावे लागेल की “माझ्याशिवाय इतर कोणताही वारस नाही

महत्त्वाच्या तारखा

1 ते 4 एप्रिल: चावडी वाचन पूर्ण

21 एप्रिल ते 10 मे: ई-फेरफार प्रणालीवर अर्ज व नोंदणी

10 मे नंतर: वारसनोंदीसह नवीन 7/12 उतारे वितरित

वारसनोंद प्रक्रियेची झटपट झलक

1) मृत व्यक्तीची माहिती व कागदपत्रे तयार करा

2) तलाठ्याकडे प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखला आणि प्रपत्र-५ जमा करा

3) ई-फेरफार प्रणालीवर मंजूरी मिळवा

4) मंडलाधिकाऱ्यांची अंतिम संमती

5) नवीन वारसनोंद असलेला 7/12 उतारा मिळवा

सावधान

कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी मूळ मृत्यू दाखला अनिवार्य आहे.

अर्जावर योग्य अधिकार्‍यांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे.

या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या मालमत्तेवर योग्य वारस नोंदवून घ्या तेही मोफत कोणतेही शुल्क न देता तुमचा वारस सातबाऱ्यावर नोंदवा आजच.