कुठे चाललाय आमचा महाराष्ट्र 

महाराष्ट्र

मुंबई: सरकारच डोक ठिकाणावर आहे का? अस ठणकावून विचारणारे जहाल स्वातंत्र्य सेनानी ‘केसरी ‘चे संपादक, सार्वजनिक गणपति, नवरात्र उत्सवांच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी जागृती करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी १ ऑगस्ट ला साजरी केली. गरिबांच्या हक्कासाठी आवाज बुलंद करणारे, आपल्या प्रतिसरकारच्या माध्यमातून इंग्रजांनाही सळो की पळो करून सोडणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती  ३ ऑगस्टला साजरी केली.

महाराष्ट्राला समृद्ध आचार, विचार, कृतींचा वारसा आहे अस आपण अभिमानाने सांगतो. मात्र आपल्या या महाराष्ट्रात विचारांची आणि कृतीयुक्तिंचीही अधोगती होत चालली आहे असे दिसून येते. महाराष्ट्रात नेमकं चाललय काय असे प्रश्न वारंवार पडावेत अशा घटना धडताना दिसत आहेत. स्त्रियांच्या शिक्षण आणि हक्कांसाठी लढणारा  त्यासाठी  अग्रेसर  राहिलो,या सुधारणावादी भूमिकेत मोठ्या संख्येने पुरुष अग्रणी राहिलेत. आपण समान नागरी कायद्याबद्दल बोलतो. पण समानता ही फक्त धर्म जात पंथ यातच नको तर ती माणूस म्हणून  जगू पहाणाऱ्या स्त्री-पुरुषाच्या प्रत्येक अधिकार, हक्कात हवी.

कुस्तीगीर महिलांच शोषण, मणिपुर मधील बिभत्सता ही तर अत्यंत निंदनीय घटना. बदलत्या  सत्तालोलुप  राजकारणाच्या  पार्श्वभूमीवर नैतिकता संपलेली दिसते. जनतेच्या प्रश्नाच्या नावावर खाजगीकरण, कंत्राटीकरण, बिल्डरधार्जिणेपणा,मात्र सर्वसामान्य जनतेचा आवाज कुणी होताना दिसत नाही, अशा कठीण काळात नेहमीच दुय्यम स्थानी असलेल्या महिलांवर पुरुषी षंढ मानसिकतेतुन जाहीर अपमान, टीकाटिपणी करण्याची प्रवृत्ती वाढली. ती का? तर  सत्ताकारणाच्या लढाईत महिलांना समान अधिकार जबाबदारी द्यायची नाही. फक्त पुरुषच कर्तृत्ववान असा अहंकारी समज तेच राजकारण, समाजकारण करू शकतात. महिलाना फक्त वंशपरंपरेने किवा बरी दिसते म्हणून संधी मिळते हे जाहिरपणे बोलणारे भेकड पुढे येताहेतमी

धर्माच्या नावाने अनेक विषय वादग्रस्त करून स्त्रीला पुन्हा ‘चुल नि मूल’ या चौकटीत अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळणे हा तिचा अधिकार! पण स्त्री देह ,तिचे शरीर याला तिच्या प्रगतीशी जोडून तिचे कर्तृत्व निकाली काढले जाते. माजी खासदार किरीट सोमय्या यांची तथाकथित क्लिप वायरल झाली,महिलांचे शोषण  झाल्याचा विषय पुढे आला. मात्र मणिपुरमधील बिभत्सतेच्या प्रकारानंतर सोमय्याप्रकरण चर्चा मीडियावर थांबली. आपल्याकडे महिला अत्याचार वाढलेत,  परिस्थिती चिंताजनक आहे असं नॅशनल क्राईम रिपोर्ट च्या आकडेवारी वरून दिसतय! मात्र याबाबत  सरकार सर्व आलबेल आहे असं सांगतेमी वारे सरकार. महिला सुन्दर  म्हणून  तिला खासदारकी दिली असं ,आमदार संजय शिरसाट बोलतात (तेही अधिवेशन कालावधीत?) यावर सत्ताधारी, त्यांचे पक्ष  कारवाई करत नाहीत.  यांच्यावर सरकार तें पक्ष काहीच अंकुश ठेवू शकत नाहीत याचा अर्थ  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाना हे जुमानत नाहीत.

मंत्री अब्दुल सत्तार महिला खासदाराला जाहीर शिव्या  देऊनही निर्धास्त मंत्रीपदी कायम आहेत. विरोधी पक्षातील महिलांना मारहाण होते, समाजमाध्यमातून गलिच्छ ट्रोलर्स घाण करत असतात. तथाकथित  शिवप्रेमी गुरूजी मनोहर भिडेनी महात्म्यांबद्दल वक्तव्य केले, महात्मा गांधीजीच्या आईबद्दलचे उतारे वाचन व त्यावर केलेली टिपणीचा विडियो आत्ताच का वायरल झाला? लवजिहाद आणि दोन मुलींची झालेली भयंकर हत्या,याला दोन वेगळे रंग दिले गेले! का व कशासाठी? विषय अनेक आहेत! पण तत्काल कारवाई होत नाही. अधिवेशन कालावधीतच आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी दिली गेली! काय चाललय हे नक्की? ज्याच्या हाती सत्ता तेच जनतेचे मालक झाले. दुसरं म्हणजे नगरविकास च्या नावाने काम होत असताना जनतेचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात! मागील १० वर्षाची श्वेतपत्रिका नगरविकास विभागाने काढायला हवी,पण तसे होणार नाही.

बील्डरवाले सत्ताधारी झाले की, काय भीषण परिस्थिती होते आहे पहा! दादर पश्चिम येथे  खांडके बिल्डिंग ११  व १२ आहेत,मनपाच्या गटरलाईन बाजुला सुरक्षा भिंत फोडून  त्याच जागेवर (फायरब्रिगेड  नियमानुसार किमान ३फूट अंतर  न सोडता )  विकासकाने बांधकाम केले! लोकांच्या जागांवर आक्रमण करण्याचे अधिकार यांना कुणी दिले? “मनपा जी उत्तर  व एस आर ए” मात्र करून सवरून नामानिराळे, निश्चिंत आहेत. कोण होणार आमचा आवाज?  निवडून आलेले लोकप्रतिनिधी सोयीने विकासकाच्या बाजूने असतात!  विकासकामाशेजारची खाजगी  जमीन लाटतात! खोटे नकाशे तयार करतात.

कसं जगाव जनतेने?

सरकार हो! आपण दारी या ,आपल्या कार्यालयात, मंत्रालय, मनपात कुठेही बसा, पण हे सगळ  करून आम्हा महिलांना, श्रमिक, स्थानीक जनतेला काही मिळत नसेल तर हे इव्हेंट अधिवेशन इतर मोठे खर्च कशासाठी करतो आपण? हा मोठा प्रश्न जनतेपुढे आहे. प्रश्न विचारणा-या पत्रकारांवर खेकसण्याची,दमबाजी करण्याचा ट्रेन्ड वाढतोय. (मूळात पत्रकारितेत  कमअक्कल शायनर हमाल वाढलेत) अभ्यासून समाजहितासाठी काम करणाऱ्या पत्रकारांनी जास्त सक्रिय असण्याची गरज आहे.  फक्त  स्वार्थी  नेत्यांच्या भरवशावर सुराज्याची स्वप्न पाहून शकत नाही आणि ते  स्वप्न सत्यातही येणार नाहीत. राजकीय साठमारीत समाजकारण व स्त्रीसन्मान जर हे लोकप्रतिनिधी विसरत असतील तर त्यांना त्यांची जागा महाराष्ट्रातील माताभगिनी निश्चितच दाखवेल आणि त्याच दिशेने आपला महाराष्ट्र चालला आहे, अस म्हणण्यास पूर्ण वाव आहे आणि म्हणूनच म्हणतोय,सरकार आपलं डोक जागेवर आणा.