औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील एका ग्रामपंचायतचा हटके निकाल हाती आला आहे. सख्या मावस भावांच्या बायका ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र मतमोजणी सुरु असतानाच दोन्ही उमेदवारांना समान मत मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढावी लागली. त्यानंतर एकीचा विजय तर दुसरीचा पराभव झाला आहे.
कन्नड तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सख्या मावस भावांच्या अर्धागणी निवडणुकीत आमने सामने होत्या. पूजा सचिन राठोड या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर रेश्मा राहुल राठोड एकनाथ या शिंदे गटाकडून रिंगणात होत्या. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. तर आपणच विजय होणार असा दावा देखील दोन्ही गटाकडून करण्यात आला होता. दरम्यान मतमोजणी वेळी दोघींना 540 मतदान झाल्याने चिठ्ठी काढण्यात आली आहे. ज्यात पूजा सचिन राठोड यांचा विजय झाला आहे.