शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका महिलेला दाम्पत्याने दिलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने प्रवीण प्रकाश शिर्के व प्रियांका प्रवीण शिर्के या दाम्पत्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील हिराबाई शिर्के यांना त्यांचा मुलगा प्रवीण शिर्के व सून प्रियांका शिर्के हे वारंवार मानसिक त्रास दिल्याने हिराबाई या दोघांच्या त्रासाला कंटाळल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मागील महिन्यात घरात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या घटनेमध्ये हिराबाई प्रकाश शिर्के (वय ५२) रा. चौधरी वस्ती निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे या महिलेचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अमोल प्रकाश शिर्के (वय ३२) रा. चौधरी वस्ती निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रवीण प्रकाश शिर्के व प्रियांका प्रवीण शिर्के दोघे रा. चौधरी वस्ती निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे हे करत आहे.