बीज प्रक्रिया मुळे रोग किडीचा प्रादुर्भाव कमी होईल: जयवंत भगत

शिरूर तालुका

शिंदोडी: खरीप हंगामात कृषी विभागाने विविध लोकसहभागातील मोहीम हाती घेतल्या असुन बीज प्रक्रिया मोहीम प्रभावशाली राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी सहायक जयवंत भगत केले आहे.

खरीप हंगामात बाजरी मुग सोयाबीन उडीद या पिकाची पेरणी करत असताना बीज प्रक्रिया केली तर उद्भवणारे रोग व किडीचा प्रादुर्भाव न होता उत्पादन वाढ होईल व बुरशीनाशक व किटकनाशकाच्या खर्चात बचत होऊन नफ्यात वाढ होत असल्याचे भगत यांनी सांगितले. जैविक बीजप्रक्रिया रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा या बुरशीजन्य घटकाचा वापर पिकावरील रोग नियंत्रणासाठी होत आहे.

तसेच पिकावरील मर, मूळकूज अशा जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशीमुळे उद्भवणाऱ्या रोगाचे (उदा. फ्युजॅरीयम, रायझोक्टोनिया, स्क्लेरोशीयम, पिथीयम) नियंत्रण ट्रायकोडर्मा बीज प्रक्रियेमुळे चांगले होऊ शकते असे हि सांगितले आहे. तसेच अधिक उत्पादन साठी जैविक जिवाणु खतांची बिज प्रक्रिया मुळे नत्र स्फुरद व पालश उपलब्धता होत असल्याने अधिक फायद्याची होत आहे.