उसाच पाचट जाळण्यापेक्षा ऊस पाचट कुटीचा होतोय फायदा…

शिरूर तालुका

शिदोंडी येथे रामदास फडके यांच्या शेतातील प्रयोग

शिंदोडी: शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने विविध मोहीमा हाती घेतल्या असुन शेतकऱ्यांना या मोहिमेचा चांगला फायदा दिसुन येत आहे. बियाणे उगवण क्षमता तपासणी मुळे बियाण्याचे प्रमाण तसेच रासायनिक बीज प्रक्रिया मुळे किड रोगाला अटकाव जैविक बीज प्रक्रिया मुळे जोमदार वाढ अशा स्वरुपाचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होत असल्याचे लक्षात येत असुन विविध मोहीमेत जमिनिच्या सुपिकतेसाठी तसेच उसाच्या खोडव्याचे उत्पादन वाढीसाठी ऊस पाचट व्यवस्थापन हा कार्यक्रम लोकसहभागातुन कृषी विभागाने हाती घेतला आहे.

त्यासाठी कृषी सहायकांनी प्रत्येक गावात ऊस पाचट व्यवस्थापनचे महत्व पटवुन देण्यासाठी गावपातळीवर कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना पाचट कुटी उपलब्ध करुन देऊन चांगला प्रयत्न केला गेला असुन त्यामुळे आज खोडवा ऊसामध्ये पाचट व्यवस्थापनचा चांगला फायदा दिसुन येत आहे. नवीन ऊस लागणीप्रमाणे खोडवा ऊस दिसुन येत असल्याने पाचट व्यवस्थापन किती महत्वाचे आहे हे शेतकऱ्यांना पटले आहे.

शिंदोडी, गुनाट, निर्वी, चिंचणी, धुमाळवाडी परिसरात कृषी सहायक जयवंत भगत संतोष फलके यांनी शेतकऱ्यांना पाचट ठेवण्यासाठी प्रवृत्त करुन योगदान दिले असुन वेळोवेळी खत व्यवस्थापन किड व्यवस्थापन रोग नियंत्रण साठी प्रत्यक्ष बांधावर येऊन मार्गदर्शन करीत असल्याने उत्पादन वाढीसाठी फायदा होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.