शिरुरच्या साहिल लंघे ला MHT CET परीक्षेत 99.7 टक्के मार्क

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या एमएचटी CET 2023 परीक्षेत शिरुरच्या साहिल विजय लंघे यास 99.7 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असुन संगणक क्षेत्रात करियर करण्याचा मानस साहिल यांनी व्यक्त केला आहे.

शिरुर येथील विद्याधाम प्रशाला ज्युनिअर महाविद्यालयात साहिल विज्ञान विभागात बारावीत शिक्षण घेत होता. साहिल याने बारावी उत्तीर्ण झाल्यावर एमएचटी सीइटी 2023 (पी सी एम) परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला 99.7 टक्के गुण प्राप्त झाले असुन या गुणांवर त्यांनी समाधान व्यक्त केले मात्र 100 टक्के पडले असते. तर आणखी आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया साहिल यानी दिली. साहिलचे वडील विजय लंघे खासगी कारखान्यात नोकरीस असून आई सुनंदा लंघे शिरुर येथील ज्ञानगंगा विश्वविद्यालयात मुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहेत.

त्याच्या पालकांनी पहिल्यापासून साहिलचा कल पाहून त्यास शिक्षणास प्रोत्साहन दिले असून यापुढेही अशीच आमची भूमिका राहणार असल्याचे लंघे दांपत्याने सांगितले. भविष्यात संगणक अभियंता होण्याचे साहिलचे ध्येय असुन माझ्या यशात पालकांचा मोठा वाटा असल्याचे तसेच त्यांचे सातत्याने सकारात्मक प्रोत्साहन मिळाल्याचे साहिल याने सांगितले.